दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडू! बच्चू कडूंचा इशारा; आंदोलन १७पर्यंत स्थगित.

कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंच्या भेटीसाठी सिन्नरकडे रवाना झालेले ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू आणि समर्थकांना पोलिसांनी मोहदरी घाटातच अडवले. परंतु, कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, १७ तारखेला कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर दर १५ दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, असा थेट इशाराच सरकारला दिला.विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यसरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, त्यांच्या शेतीमालास हमीभाव मिळावा, यासाठी माजी आमदार कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर मशाल आंदोलन केले.

याप्रसंगी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. मात्र, या मोर्चावेळी कडू यांची नाशिकला कोकाटेंशी भेट होऊ शकली नाही. कडू यांनी ‘तुम्ही कुठे आहात,’ असा प्रश्न कोकाटे यांना केला असता, ‘मी ४० किलोमीटर लांब आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यावर कडू आणि समर्थक सिन्नरकडे रवाना झाले.परंतु, पोलिसांनी मोहदरी घाटात त्यांना अडवले. यावेळी कडू यांनी कोकाटेंना भेटण्याचा हट्ट धरला. परंतु, कोकाटे यांनी आपण मतदारसंघातील गावांमध्ये यात्रांनिमित्त फिरत असल्याचे सांगत भेटण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडू यांच्यात फोनवरून संवाद करून दिला. कोकाटे यांनी येत्या १७ तारखेला कर्जमाफीसंदर्भात बैठक बोलावली असल्याचे सांगत, त्यासाठी कडूंनाही आमंत्रण दिले.

त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. आम्ही आता १७ तारखेपर्यंत थांबत आहोत. त्यावेळी कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर १५ दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडू, असा इशारा त्यांनी दिला.राज्य सरकारसह आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर चर्चा करण्यासाठी येत्या १७ रोजी शेतकरी संघटनेसोबतच बैठकीचे आयोजन केल्याचे कोकाटेंनी कडूंना सांगितले. १७ तारखेनंतरही आम्ही तुमच्याशी चर्चा करू. तुमच्यासाठी रेड कार्पेट आहे. मी कधीही खोटे बोलत नाही. सरकार तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन कोकाटे यांनी यावेळी प्रहारच्या आंदोलकांना दिले.

  • Related Posts

    साईंचं दर्शन अधुरं; सात जणांच्या कुटुंबाला भीषण अपघात, पती-पत्नीचा एकत्र अंत, चिमुकलीसह पाचजण जखमी.

    जालन्यात एकाल कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला. हे कुटुंब शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला निघालं होतं. या घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.जालन्यात एक भीषण अपघात घडला आहे. सोमवारी (12 मे) मध्यरात्री…

    जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन.

    जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन. जळगाव जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावीजळगाव : आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवू इच्छीतो की, जळगाव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साईंचं दर्शन अधुरं; सात जणांच्या कुटुंबाला भीषण अपघात, पती-पत्नीचा एकत्र अंत, चिमुकलीसह पाचजण जखमी.

    साईंचं दर्शन अधुरं; सात जणांच्या कुटुंबाला भीषण अपघात, पती-पत्नीचा एकत्र अंत, चिमुकलीसह पाचजण जखमी.

    जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन.

    जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन.

    26 वर्षीय भारतीय तरुणीला दुबईत संपवलं, सोशल मीडियावर ओळख झालेला मित्र अटकेत.

    26 वर्षीय भारतीय तरुणीला दुबईत संपवलं, सोशल मीडियावर ओळख झालेला मित्र अटकेत.

    मी पोलीस आहे! तुला आता सोडत नाही; पोलीस दाम्पत्याने एसटी चालकाला बुकललं, नेमकं काय घडलं.

    मी पोलीस आहे! तुला आता सोडत नाही; पोलीस दाम्पत्याने एसटी चालकाला बुकललं, नेमकं काय घडलं.