कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, तळोजा कारागृहात घेतला गळफास.

कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने कारागृहात आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी तळोजा कारागृहात होता. आज रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने मध्यवर्ती कारागृहातील बाथरुममध्ये आत्महत्या केली असल्याचं समोर आलं असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.आरोपी विशाल गवळी याने कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२४ मध्ये लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर त्या मुलीची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या साहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले होते. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली होती. या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळी होता. विशाल गवळी तळोजा कारागृहात होता.

त्याने शौचालयात टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जे .जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं होतं. त्याच्याविरोधात असंख्य गुन्हे होते. तसंच तडीपारीची देखील कारवाई केली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलींवर अत्याचाराचा हा काही त्याचा पहिलाच गुन्हा नव्हता, यापूर्वीही त्याने अशी कृत्य केली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये विशाल गवळीला एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी अटक झाली होती. क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीने पाठलाग करून भररस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आरोपी गवळीने तेव्हा केला होता.

त्यानंतर त्याला अटक झाली, मात्र आरोपीचा मुजोरपणा एवढा होता की पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याने व्हिक्टरी खून दाखवत, कायदाही आपलं काही बिघडवू शकत नाही, कायद्याला घाबरत नसल्याचं त्याने या कृतीतून दर्शवलं होतं.धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीचा हा वर्षभरातला दुसरा गुन्हा होता. याआधी अशाच प्रकरणात तो जेलमध्ये होता. मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आली होती. मात्र आरोपी विशाल गवळी हा मनोरुग्ण नसल्याचं स्पष्ट झालं. त्यासंदर्भात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नव्हते. पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय, कल्याण न्यायालय आणि अन्य रुग्णालयांकडून माहिती मिळवली, मात्र आरोपी मनोरुग्ण असल्याचे कोणतेही कागदपत्र कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नव्हते, त्यामुळेच तो मनोरुग्ण नसल्याचं स्पष्ट झालं.

  • Related Posts

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा…

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका निधी देशमुखने पती शंतनूची विष देऊन हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला. नंतर मृत शंतनूच्या मित्रांना पाठवलेल्या मेसेजमधील एका शब्दाने तिच्या गुन्ह्याची उकल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.