धक्कादायक! अवैध वसतिगृहात लैंगिक शोषण; खडवलीतून २९ बालकांची सुटका, संचालकासह पाच अटकेत.

खडवली परिसरातील ‘पसायदान विकास संस्था’ या अवैध वसतिगृहात बालकांना मारहाण करण्यात आल्याची तसेच लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.खडवली परिसरातील ‘पसायदान विकास संस्था’ या अवैध वसतिगृहात बालकांना मारहाण करण्यात आल्याची तसेच लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. जिल्हा प्रशासनाने कारवाई करत २९ बालकांची सुटका केली आहे. याप्रकरणी संस्थेचा संचालक बबन शिंदे याच्यासह अन्य चौघांना बाल न्याय अधिनियम २०१५ आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइनवर खडवली येथील ‘पसायदान विकास संस्थे’बाबत तक्रार आली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तातडीने ११ एप्रिल रोजी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या दरम्यान बालकांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या, तसेच लहान बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संस्थेत असलेल्या २९ बालकांची सुटका केली.

यामध्ये २० मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करत, बालकांच्या देखरेखीबाबत निर्णय घेण्यात आला.या प्रकरणी, संस्था संचालक बबन नारायण शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे, संचालक मुलगा प्रसन्न शिंदे, त्यांना मदत करणारे प्रकाश सुरेश गुप्ता आणि दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टिटवाळा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हे पाचही जण खडवली परिसरात राहणारे आहेत.सुटका करण्यात आलेली मुले शाळेत शिक्षण घेत असून त्यांची परीक्षा लक्षात घेता त्या दृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उल्हासनगर येथील मुलींचे विशेषगृह/बालगृह तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे शासकीय बालगृह येथे सुरक्षित दाखल करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.चार दिवसांच्या कोठडीत रवानगी अटक केलेल्या सर्व आरोपींना कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.

  • Related Posts

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    भडगाव येथील प्रतिष्ठित सौ. जयश्री गणेश पुर्णपात्री ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या HSC बोर्ड वार्षिक परीक्षेमध्ये श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७% गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याआधी, २०२३…

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?

    पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?

    भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.

    भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.