जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्री कार्यालयाला आला खळबळजनक ईमेल.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल, असा धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Jalgaon District Collector Ayush Prasad) यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल. त्याच बरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा स्वरूपाचा धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO Maharashtra) प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठविण्यात आला असून पोलीस या ई-मेलच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे.

तर जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याबाबत अगोदर ही तीन ते चार वेळेस धमकीचे मेल हे पोलिसांना मिळाले आहेत. या मेल मधील भाषा पाहता अशा ईमेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही. मात्र तरीही या सगळ्या घटनेबाबत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करत मेल करण्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.  दरम्यान, अटक न करण्यासाठी व वरिष्ठांकडे अहवाल न पाठवण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे केंद्रीय अर्धसैनिक दलात कार्यरत असून, कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीने 4 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (47) व धनराज निकुंभ यांनी तक्रारदाराकडे अटक न करण्यासाठी आणि वरिष्ठांना अहवाल न पाठवण्यासाठी एकूण 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात शुक्रवार (दि.11) रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणी दरम्यान हवालदार धनराज निकुंभ यांनी तडजोडीअंती 20 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवार (दि.11) रोजी सापळा रचत कारवाईत हवालदार रवींद्र सोनार यांना 20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

  • Related Posts

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

     पंतप्रधान मोदींकडे  प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…