हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू!

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू! जळगाव -: हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यातील या पिकांसाठी विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जिल्हयात भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत मृग बहार सन २०२४ मध्ये पेरु, मोसंबी, लिंबू,

सिताफळ व डाळीब या ५ पिकासाठी तर आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा, केळी, डाळिंब, पपई व मोसंबी या ५ पिकासाठी जिल्हयात हवामान धोक्यांच्या निकाषानुसार राबविण्यात येत आहे. पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक-यांनी फळपिकाचा विमा घेतलेला आहे.

परंतु फळपिकाची ई-पिक पाहणी डीजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅपव्दारे केलेली नाही. त्यांनी दिनांक २५ एप्रिल २०२५ पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा ७/१२ उता-यावर ई-पिक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रदद करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान मुराद तडवी यांनी दिली आहे.

  • Related Posts

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा…

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका निधी देशमुखने पती शंतनूची विष देऊन हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला. नंतर मृत शंतनूच्या मित्रांना पाठवलेल्या मेसेजमधील एका शब्दाने तिच्या गुन्ह्याची उकल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.