अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; ८ ते १० जण जखमी.

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील  अंजनेरी पर्वतावर दरवर्षी हनुमान जयंतीच्या  निमित्ताने मोठया संख्येने भाविक येत असतात. यावर्षी देखील हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. मात्र, हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी आज (शनिवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. तसेच मधमाशांच्या (Bees) या हल्ल्यात ८ ते १० भाविक जखमी झाल्याचे समजते. मंदिरात दर्शनासाठी जात असतांना अचानक मधमाशांनी हल्ला (Attack) केल्यामुळे याठिकाणी काही वेळ भाविकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, मधमाशांच्या या हल्ल्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर याठिकाणी डॉ. कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली जखमींवर  उपचार सुरु आहेत. अंजनेरी येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार गडावरील दरवाजाजवळ मधमाशांनी भाविकांवर हा हल्ला केला.

  • Related Posts

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध…

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी दुर्घटना घडली. पहिल्या घटनेत, नागभीड तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश दडमल आणि राकेश बदन या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंदेवाहीजवळ तेंदुपत्ता तोडण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.

    हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.