पोलिसांसमोरच यात्रा कमिटीच्या विशेष सभेत राडा, शिवीगाळ करत ग्रामस्थ धावले एकमेकांच्या अंगावर.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ग्रामस्थांमध्ये राडा झाला. देणगीतील रकमेच्या खर्चावरून वाद निर्माण होऊन बाचाबाची झाली, थेट ग्रामस्थ हे एकमेकांच्या अंगावर देखील धावले. पोलिसांसमोरच ग्रामस्थ भिडले. काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीची विशेष सभा बोलवण्यात आली होती. तहसीलदार जीवन बनसोडे अध्यक्षस्थानी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रज्ञा कांबळे सचिव म्हणून उपस्थित होत्या. सभा पार पडली, या सभेमध्ये काही विषय आले आणि याच विषयाला अनुसरून सभा पार पडल्यानंतर तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनात गेल्या. भिगवण पोलिसांच्या समोरच ग्रामस्थांनी राडा घातला. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. आता याप्रकरणी भिगवण पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या सभेत अनेक मागण्या, प्रश्न मांडले गेले. सभा सुरळीत पार पडत होती. मात्र, शेवटी वातावरण तापले.

ग्रामस्थांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता उपस्थित ग्रामस्थ एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत एकमेकांवर धावून गेले. विशेष म्हणजे भिगवन पोलिसांसमोरच हा राडा झालाय. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला. मात्र, तोपर्यंत मारहाणही झाली.यासंदर्भात इंदापूरच्या तहसीलदार जीवन बनसुडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भिगवन गावची यात्रा आहे. या यात्रे संदर्भात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट भिगवण अशी एक पूर्वीची ट्रस्ट असून या ट्रस्टमधील सर्व ट्रस्टी हे मयत आहेत. त्यामुळे 2023 साली शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक यासोबतच स्थानिक पोलीस यांच्या सदसत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे.

ही समिती धार्मिक उत्सव पार पाडत असते आणि त्याच अनुषंगाने माझ्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित केली होती.टसभेदरम्यान यात्रेकरीत जी लोकवर्गणी जमा होईल त्यातील 40 टक्के रक्कम ही यात्रेकरीता खर्च करावी आणि उर्वरित 60 टक्के रक्कम इतर कामांसाठी खर्च करावी असे विविध मुद्दे पुढे आले. तर काहींनी याला विरोध दर्शवला. यात्रेसाठी जमा होणारी लोक वर्गणी ही यात्रेकरिताच खर्च झाली पाहिजे. असाही मुद्दा मांडला गेला. यावर चर्चा मसलत होऊन सभा पार पडली. मात्र, सभा पार पडल्यानंतर मी दुसऱ्या दालनात गेलो होतो आणि त्यानंतर पाठीमागे ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत हे वाद मिटवले.

  • Related Posts

    भरसभेत अजित दादा म्हणाले, ‘जन्माला आल्यापासून पाण्याशिवाय दुसऱ्या एका थेंबालाही हात…’; एकच हशा पिकला.

     चालू कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना पाण्याची बॉटल दिली यावेळी एक माध्यम प्रतिनिधी कॅमेऱ्याची सेटिंग करण्यासाठी उभा राहताच जोरदार टोलेबाजी केली.चालू कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…

    पुणं पुन्हा हादरलं! सासरच्यांचा हुंड्याचा हव्यास संपेना; विवाहितेनं कंटाळून आयुष्य संपवलं.

    पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं आयुष्य संपवलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पुणे: पिंपरी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरसभेत अजित दादा म्हणाले, ‘जन्माला आल्यापासून पाण्याशिवाय दुसऱ्या एका थेंबालाही हात…’; एकच हशा पिकला.

    भरसभेत अजित दादा म्हणाले, ‘जन्माला आल्यापासून पाण्याशिवाय दुसऱ्या एका थेंबालाही हात…’; एकच हशा पिकला.

    पुणं पुन्हा हादरलं! सासरच्यांचा हुंड्याचा हव्यास संपेना; विवाहितेनं कंटाळून आयुष्य संपवलं.

    पुणं पुन्हा हादरलं! सासरच्यांचा हुंड्याचा हव्यास संपेना; विवाहितेनं कंटाळून आयुष्य संपवलं.

    नवीन मोबाईल तुला कोणी दिला? पत्नीने उत्तर न दिल्याने पती संतापला आणि अचानक चुलीत…हैराण करणारी घटना.

    नवीन मोबाईल तुला कोणी दिला? पत्नीने उत्तर न दिल्याने पती संतापला आणि अचानक चुलीत…हैराण करणारी घटना.

    इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ते माओवाद्यांचा म्होरक्या; डोक्यावर ६ कोटींचं बक्षीस, चकमकीत ठार झालेला बसवराजू कोण होता?

    इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ते माओवाद्यांचा म्होरक्या; डोक्यावर ६ कोटींचं बक्षीस, चकमकीत ठार झालेला बसवराजू कोण होता?