बुलढाण्यातील त्या मुलाचा मृत्यू उष्माघाताने नाही, तर… वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती समोर.

राज्यातील बहुतांश भागात तापमान चांगलंच वाढलं आहे. विदर्भात तर पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलं आहे. तर चंद्रपुरातही पारा वाढताच आहे. या कडक उन्हाचा ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच बुलढाण्यात उष्माघातामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ माजली होती. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज कॉन्व्हेंट मधील बारा वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचं समजलं. या घटनेने बुलढाण्यात सर्वत्र एकच खळबळ माजली, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, नेमकं या मृत्यूचे कारण काय याबाबत आरोग्य प्रशासन स्थानिक प्रशासन वेगाने आपल्या तपासण्या करत होती.

यामध्ये संस्कारचा मृत्यू हा उष्माघाताने झालेला नाही, तर त्यामागे एक वेगळंच कारण समोर आलं आहे. या मुलाचा मृत्यू हा विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाल्याचं समोर आलं आहे.एकीकडे उन्हाचे चटके वाढत असल्याने लोकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. पण, ज्या पद्धतीने एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वत्र राज्यांमध्ये उन्हाची दाहकता जाणवत असताना त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या माध्यमांच्या बातम्यांमुळे सर्वत्र एकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता हा मृत्यू ज्या बाबींमुळे झालेला आहे ते समोर आल्यामुळे लोकांनी उन्हाबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहेच, मात्र नागरिकांनी तरी काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संस्कार सोनटक्के या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू हा उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाला असल्याचं स्पष्टीकरण अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. आशिष गिऱ्हे यांनी दिले आहे. मात्र, ज्या पद्धतीने संस्कार सोनटक्के च्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि त्यानंतर आलेला अहवाल हा कुठेतरी प्रशासनाला आता तरी वाढत चाललेल्या उन्हाच्या दाहकतेर तरी उपाययोजना करण्याकरता विचार करणार असल्याचे म्हटल्यास वावग ठरणार नाही.

  • Related Posts

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी उपक्रम…

    दोन ट्रॅक्टर आणि साहित्य केले जप्त एरंडोल तहसीलदार यांची कारवाई.

    आज मौजे कढोली तालुका एरंडोल येथे महसूल पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अवैध वाळू उपसा विरुद्ध धडक कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रॅक्टर, 2 केनी मशीन , दोर खंड व…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..

    दोन ट्रॅक्टर आणि साहित्य केले जप्त एरंडोल तहसीलदार यांची कारवाई.

    दोन ट्रॅक्टर आणि साहित्य केले जप्त एरंडोल तहसीलदार यांची कारवाई.

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.