रात्री दोघे हॉटेलमध्ये गेले, सकाळी एकाची बॉडी सापडली; लिव्ह-इन पार्टनरसमोरच तरुणाने जीव दिला.

एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरसमोरच आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याने आपलं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे.हॉटेलमध्ये लिव्ह-इन पार्टनरसोबत गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. एका OYO हॉटेलमध्ये या इंजिनियरने आपली जीवनयात्रा संपवली. उमेश सिंह (वय 38) असं त्यांचं नाव आहे. तो त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत हॉटेलमध्ये थांबला होता. दरम्यान, या दोघांमध्ये कुत्र्याच्या उपचारावरून वाद झाला. त्यातून उमेशने हॉटेलच्या रूममध्ये पंख्याला गळफास लावून घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, गुरुवारी सकाळी 11 वाजता उमेश सिंह आणि त्यांची 22 वर्षांची गर्लफ्रेंड सेक्टर-27 मधील वेमेशन ओयो हॉटेलमध्ये आले होते. दोघांनी सोबत जेवण केलं. पण त्यानंतर त्यांच्यात काहीतरी वाद झाला.

त्या तरुणीने पोलिसांना सांगितलं की, “ती वॉशरूममध्ये असताना उमेशने गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली.” जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिला उमेश पंख्याला लटकलेला दिसला. तिने लगेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांन ही गोष्ट सांगितली. उमेशला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.गर्लफ्रेंडने पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मिळून एक कुत्रा विकत घेतला होता. तो काही दिवसांपासून आजारी होता. त्या कुत्र्याच्या ऑपरेशनवरून दोघांमध्ये मतभेद झाले. कुत्र्याचं ऑपरेशन करायचं की नाही, यावरून दोघांमध्ये वाद झाला. दुसरीकडे, उमेशच्या घरच्या लोकांचं म्हणणं आहे की, कुत्रा त्यांचा होता आणि उमेश फक्त त्याची काळजी घेत होता.

या घटनेनंतर पोलिसांनी हॉटेलमधील रूम सील केलं आहे. उमेशचा मोबाइल फोन जप्त केला आहे. या घटनेबाबत काही पुरावे मिळतात का, हे पोलीस पाहतायेत. पोलिस त्या तरुणीची कसून चौकशी करत आहेत. उमेशने याआधीही अनेकवेळा जीव देण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती मुलगी बी.बी.ए. (BBA) चं शिक्षण घेत आहे. दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी हॉटेल आणि हॉस्पिटलची भूमिका पण तपासणार आहेत. कारण हॉस्पिटलने पोलिसांना घटनेची माहिती उशिरा दिली. हॉटेल प्रशासनाकडून लायसन्स आणि इतर कागदपत्रं तपासली जातील. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. उमेशचं लग्न झालं होतं, पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर तो गर्लफ्रेंडसोबत राहत होता.

  • Related Posts

    मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती.

    जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये जळगाव महानगरपालिका च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव मध्ये नवीन दोन शहर उपाध्यक्ष…

    ‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.

    एकाच वेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती.

    मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती.

    ‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.

    ‘न्याय झाला,जय हिंद!’ ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला, ९० दहशतवादी ठार.

    बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…

    बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…

    ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान भेदरला, LoC वर अंदाधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू, सेनेकडून चोख प्रत्युत्तर.

    ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान भेदरला, LoC वर अंदाधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू, सेनेकडून चोख प्रत्युत्तर.