मारहाण झाल्याचा भास व्हावा यासाठी मेकअप, मित्रांच्या साथीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, धक्कादायक कारण समोर.

नालासोपारा येथे रोहन तिवारी हा 22 वर्षांचा तरुण आई, दोन लहान भाऊ, काका अशा एका संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहे. एका अज्ञातस्थळी रोहनला बांधून ठेवलेले असल्याचा आणि त्याला मारहाण करण्यात आल्याने रक्तबंबाळ झाल्याचा व्हिडिओ रात्री अचानक त्याच्या काकांच्या मोबाईलवर रोहनच्याच मोबाईलवरून पाठवण्यात आला. तीन लाख रुपये द्या नाहीतर रोहनला ठार मारण्यात येईल असे देखील या व्हिडिओत सांगण्यात आले.मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादाय घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. व्यवसाय करायचा असल्याने घरी पैसे मिळणार नाहीत म्हणून घरातल्यांकडून पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा, तीन लाखांची खंडणी मागत रोहन तिवारी या 22 वर्षांच्या तरुणाने बनाव रचला. याप्रकरणी रोहन तिवारी याच्यासह त्याच्या दोन मित्रांना देखील आचोळे पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा येथे रोहन तिवारी हा 22 वर्षांचा तरुण आई, दोन लहान भाऊ, काका अशा एका संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहे. एका अज्ञातस्थळी रोहनला बांधून ठेवलेले असल्याचा आणि त्याला मारहाण करण्यात आल्याने रक्तबंबाळ झाल्याचा व्हिडिओ रात्री अचानक त्याच्या काकांच्या मोबाईलवर रोहनच्याच मोबाईलवरून पाठवण्यात आला. तीन लाख रुपये द्या नाहीतर रोहनला ठार मारण्यात येईल असे देखील या व्हिडिओत सांगण्यात आले.

या संपूर्ण प्रकारानंतर घाबरलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी आचोळे मध्ये सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी रोहनच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते चेंबूरच्या म्हाडा कॉलनी परिसरात असल्याचे समोर आले. दाट झोपडपट्टीचा परिसर असल्याने आचोळे पोलिसांनी स्थानिक शिवाजीनगर पोलिसांची या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मदत घेतली.अपहरणकर्त्यांनी मोबाईल बंद ठेवल्याने मोबाईल लोकेशन नेमके ट्रेस होण्यास व तपास करण्यात अडथळा येत होता. याचदरम्यान रात्री पुन्हा एकदा अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि वेळ कमी असल्याचे संगत लवकरात लवकर पैसे देण्यास रोहनच्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी पोलिसांच्या सांगण्यावरून कुटुंबीयांनी पाच हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने त्यांनी व्हिडिओ पाठवलेल्या मोबाईल नंबरवर ऑनलाइन पाठवण्यात आले.

सकाळी बँक उघडल्यावर तुमचे उर्वरित पैसे देऊ असे सांगण्यात आले.दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अपहरणकर्ते रोहनला घेऊन एका ठिकाणी नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आले. यावेळी अपहरणकर्त्यांचा शोध घेत असलेल्या व परिसरात पाळत ठेवून असलेल्या पोलिसांना रोहनच्या काकांनी खूण करून रोहन आणि त्याच्यासोबत दोन तरुण आल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर पोलिसांनी रोहन सोबत असलेल्या दोघा अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.रोहन तिवारी याला मित्रांसमेवत Pritingचा व्यवसाय करायचा असल्याचे कळते. हा व्यवसाय करण्यासाठी त्याला पैसे हवे होते. मात्र घरी पैसे मागितले असते तर त्याला पैसे मिळाले नसते. त्यामुळे रोहन याने स्वतःच्या दोन मित्रांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. रोहन याचे अपहरण होऊन त्याला मारहाण झाल्याचा भास व्हावा यासाठी मेकअप देखील करण्यात आला. अपहरणाचा बनाव केल्याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात रोहन आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे आणि निखिल सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तांत्रिक शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स…

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान.

    शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान.

    जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल.

    जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल.