मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना दादांचं उत्तर, म्हणाले…

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाला तोड नसल्याचे म्हटले आहे. पुण्यातील प्रसिद्ध रूग्णालय दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. Ajit Pawar on Mangeshkr Family भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे भिसे यांना आपली पत्नी गमवावी लागली. मंगेशकर रूग्णालयाला भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार पकडलं असून आता तिसरा अहवाल समोर येणार आहे.

या प्रकरणावरून राजकारण तापलं असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर Vijay Wadettiwar Big Statement Mangeshkar Family कुटुंबावर निशाणा साधला आहे. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मंगेशकर कुटुंबाचं गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्यांनी ऑटोग्राफसाठी पैसे घ्यावेत त्यांच्याकडून काय योगदानाची ठेवायची. गाणं म्हटलं म्हणजे योगदान नाही, लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहित नाही, मी कधी ऐकलं नाही, माझ्या २५-३० वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ऐकलं नाही, त्यामुळे या कुटंबाप्रती प्रेम आस्था असण्याचं कारण नाही, असं विजय वडेट्टीवरांनी म्हटलं आहे. यावर अजित दादांनी आपली प्रतिक्रिया देताना मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती असल्याचं म्हटलंय.मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर असतील या पाचही भावंडांचं योगदान आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रीय जनतेला आपलेपणा आहे, आदर आहे त्याच्यामुळे कोणी बोलू नये असं वाटतं, असं अजित म्हणाले.

  • Related Posts

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला…

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराज व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

    मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…

    मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…

    निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!

    निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!