घरातून ड्युटीवर आलेल्या पोलिसाचा घरी मृतदेहच गेला, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गुंडू सुतार यांचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सकाळी ड्युटीवर असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सेवा बजावत असताना झालेल्या या घटनेने दोडामार्ग तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस दलात सेवा करत असताना असलेली धावपळ काहीसा तणाव यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन झाल्याचे धक्कादायक प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात घडली आहे. दोडामार्ग पोलीस स्टेशन मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गुंडू सुतार  यांचे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

गुरुवारी सकाळी ते ड्युटीवर आले यावेळी सेवा बजावत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने ते तातडीने उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गेले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना गोव्यातील म्हापसा किंवा बांबोळी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांना जवळच असलेल्या गोवा राज्यातील म्हापसा रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. यामुळे सुतार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील करता व कमवता आधारच निष्ठुर नियतीने हिरावून नेला आहे.तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित मूळ पाट्ये गावचे सध्या झरेबांबर तिठा येथे घरी राहत होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक सुतार हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

दीपक सुतार यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी दोडामार्ग येथे दाखल झाले होते. दोडामार्ग पोलीस कर्मचारी समीर सुतार यांचे ते नातेवाईक होते. त्यांच्या निधनाने दोडामार्ग परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिस सलामी देऊन पुनर्वसन स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत महाराष्ट्रात काही ठिकाणी व कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पोलीस दलात आपली सेवा बजावत असताना झालेल्या या घटनेने दोडामार्ग तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या मित्राने घेतलेली अकाली एक्झिट अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे.

  • Related Posts

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे बारावी पास.

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील अनाथ प्रवेशीता लक्ष्मी विलास शिंदे हि प्रवेशिता  आज दिनांक 18/06/2024 रोजी मुलींचे निरीक्षणगृह, जळगांव येथून दाखल झालेली होती. संस्थेतून तिच्या पुढील शिक्षणा साठी (12…

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    माहिती अधिकार व पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारीतेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतुने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  हारून अ. समद शेख व राष्ट्रीय महासचिव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे बारावी पास.

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी  शिंदे बारावी पास.

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील