विक्रांत राऊण्ड मारायला गेलेले, आहेत कुठे? सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा वेदनादायी अंत.

विक्रांत एका हत्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी चार दिवसांच्या सुट्टीवर मंगळवारी घरी आला होता, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. बुधवारी मध्यरात्री त्याची हत्या झाली.हत्येच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी सुट्टीवर आलेल्या लष्करातील जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. विक्रांत गुर्जर (२७) असे या जवानाचे नाव आहे. तो सहारणपूर जिल्ह्यातील मुदिखेडी गावचा रहिवासी होता.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेला विक्रांत एका हत्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी चार दिवसांच्या सुट्टीवर मंगळवारी घरी आला होता, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. बुधवारी मध्यरात्री त्याची हत्या झाली. रात्री जेवल्यानंतर विक्रांत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर गेला होता. तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी फोनवर संपर्क साधला. मात्र त्याचा फोन बंद होता.

गुरुवारी सकाळी काही ग्रामस्थांना एका रस्त्याजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर, तसेच छातीवर बंदुकीच्या गोळीच्या जखमा होत्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सागर जैन यांनी दिली.विक्रांतच्या दोन्ही बहिणी विवाहित आहेत. विक्रांत आणि त्याचा धाकटा भाऊ हर्ष यांचे अजून लग्न झाले नव्हते. हर्ष गावात राहतो आणि शेतीचे काम पाहतो. विक्रांत हा त्याचा नातेवाईक रजत याच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.बुधवारी संध्याकाळी ७ वाजता जेवण करून विक्रांत घराबाहेर पडला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. सकाळी शेतकरी शेतात जाण्यासाठी बाहेर पडले तेव्हा गोळ्या लागलेला त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळला.घटनेच्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी जमली. माहिती मिळताच सीओ एसएन वैभव पांडे आणि कोतवाली प्रभारी संजीव कुमार पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती गोळा केली. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले.जिल्हा एसएसपी रोहित सिंह सजवान यांनी सांगितले की, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गावात कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे.

  • Related Posts

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले,…

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.नवी मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.