हॉट एअर बलूनची दोरी तुटली; कामगार 100 फुटांवरुन कोसळला; भयंकर दुर्घटनेत करुण अंत.

जिल्ह्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित समारंभात मोठी दुर्घटना घडली. हॉट एअर बलून शो सुरु असताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वासुदेव खत्री असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.जिल्ह्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित समारंभात मोठी दुर्घटना घडली. हॉट एअर बलून शो सुरु असताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वासुदेव खत्री असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. 40 वर्षीय वासुदेव खत्री बलून कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. खत्री यांच्या मृत्यूनं समारंभाला गालबोट लागलं. सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडलं. संपूर्ण समारंभावर शोककळा पसरली.
बारां जिल्ह्याच्या स्थापनेनिमित्त क्रीडा संकुलात हॉट एअर बलून शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अटरु बारांचे मतदारसंघाचे आमदार आणि भाजप नेते आनंद गर्ग उपस्थित होते.

दुर्घटना घडली त्यावेळी हॉट एअर बलूनमध्ये शाळकरी मुलं चढणार होती. हॉट एअर बलून कंपनीचे संचालक विक्रांत सागर शोवेळी उपस्थित होते. तेच बलून टेस्टिंग करत होते. या प्रकरणी पोलिसांनी सागर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून झालेल्या चुकीमुळे ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.टेस्टिंग सुरु असताना वासुदेव खत्री जमिनीवर उभे होते. तितक्यात बलून अचानक उडू लागला. बलूनला असलेल्या दोरीचं टोक खत्री यांच्या हातात होतं. बलून वर जाताच खत्रीदेखील वर ओढले गेले. पुढच्या काही क्षणांत ते 100 फूट उंचीवर पोहोचले. त्यानंतर दोरी तुटली आणि वासुदेव खत्री खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.अपघात घडण्याआधी हॉट एअर बलूनच्या २ फेऱ्या झाल्या होत्या. त्यातील एका फेरीत स्थानिक आमदारांनी त्यांच्या साथीदारांसह उड्डाण केलं होतं. तिसऱ्या फेरीआधी कर्मचारी ट्रायल घेत होते. तिसऱ्या फेरीत शाळकरी मुलं जाणार होती. मात्र ट्रायल सुरु असताना हवेचा दाब अचानक वाढला. त्यामुळे दोरी तुटली आणि खत्री यांचा जीव गेला.या दुर्घटनेनंतर भाजपचे तरुण नेते प्रशांत विजयवर्गीय यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. जिल्ह्याच्या स्थापना दिवशी अशा धोकादायक आयोजनाची गरज होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकारानंतर प्रशासनानं नैतिकतेच्या आधारावर सगळे कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. खत्री यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

  • Related Posts

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा…

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका निधी देशमुखने पती शंतनूची विष देऊन हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला. नंतर मृत शंतनूच्या मित्रांना पाठवलेल्या मेसेजमधील एका शब्दाने तिच्या गुन्ह्याची उकल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.