‘जेल माझं घर’; ‘फिल्मी डायलॉग’ मारत बिल्डरकडे मागितली खंडणी, पोलिसांनी नांग्या ठेचल्या.

नागपुरात एका बांधकाम व्यावसायिकाला कुख्यात गुंड लक्की ऊर्फ गुज्जर गौरे याने चाकूचा धाक दाखवून सात लाखांची खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे. ‘जेल माझं घर आहे’, असे म्हणत त्याने व्यावसायिकाला धमकावले. काही दिवसांपूर्वीच त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, ज्यात तो फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे काही गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. नागपुरातून तर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कुख्यात गुन्हेगार बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात जातो आण त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल 7 लाखांची खंडणी मागतो. विशेष म्हणजे जेल माझं घर आहे. तुला काय करायचं ते कर, असंही हा आरोपी म्हणतो. आपल्याला पोलिसांचं कोणतंही भय नाही, असंही तो त्याच्या वागणुकीतून दाखवतो. त्याने काही दिवसांपूर्वी टास्क फोर्समधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.

याच प्रकरणात तो फरार होता. यानंतर त्याने आता थेट एका बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पण या गुन्हेगाराच्या मनात पोलिसांबद्दल भीती निर्माण होईल का? असा प्रश्न आहे.’जेल माझं घर आहे, आत येणं-जाणं सुरूच असतं’, अशा फिल्मी डायलॉगसह सात मजली इमारतीचे बांधकाम करणाऱ्या एका नामांकित बिल्डरकडून तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे (वय २१) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (६ एप्रिल) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवी वस्ती परिसरात घडली.मनमोहन ओमप्रकाश मुंदडा (वय ४८) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सदर परिसरात त्यांची सात मजली इमारत उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहे. रविवारी सायंकाळी आरोपी लक्की त्यांच्या साईटवर गेला आणि थेट मुंदडा यांना चाकूचा धाक दाखवत धमकावत म्हणाला, “तुझं सात मजली इमारतीचं काम सुरू आहे, तुझी सात करोडची स्कीम सुरू आहे तर मला सात लाख रुपये हप्ता लागेल. जर तुला एकसोबत द्यायचे असेल तर दे, नाहीतर इंस्टॉलमेंट ने दे, आणि माझ्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, मला काही फरक पडत नाही. जेल माझं घरच आहे!” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंत मनमोहन ओमप्रकाश मुंदडा यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपी लक्की याला अटक करण्यात आली.कुख्यात गुंड लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे दोन महिन्यांपूर्वी एमपीडीएखाली अटकेतून सुटल्यावर पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, मारहाण, दहशत पसरविणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने मध्यप्रदेशात स्पेशल टास्क फोर्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात तो सध्या फरार होता. नागपूरमध्ये बिल्डरकडून खंडणी मागितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

  • Related Posts

    बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

    पुण्यातील दौंडमध्ये बिबट्याने एका १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं आहे. सध्या वनविभागाकडून त्या बाळाचा शोध घेतला जात आहे.दौंड तालुक्यातील दहिटणे या गावामध्ये एक भीषण घटना घडली आहे. येथे एका १०…

    बारामतीमध्ये ३६ वर्षातील ऐतिहासिक निकाल, दौंडच्या नरवार हत्या प्रकरणात १२ जणांना जन्मठेप.

    बारामती न्यायालयाने एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल दिला आहे. दौंडमधील एका हत्ये प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाने १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चार सख्ख्या भावांसह तीन महिलांना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

    बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

    बारामतीमध्ये ३६ वर्षातील ऐतिहासिक निकाल, दौंडच्या नरवार हत्या प्रकरणात १२ जणांना जन्मठेप.

    बारामतीमध्ये ३६ वर्षातील ऐतिहासिक निकाल, दौंडच्या नरवार हत्या प्रकरणात १२ जणांना जन्मठेप.

    जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न.

    जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न.

    महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.

    महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.