सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस, प्रकाश आंबेडकरांची पोस्ट, आजच्या सुनावणीत काय झालं?

परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती .याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली .ऍड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली आहे .ये सुनावणी दरम्यान काय झालं हे त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे .गेल्या अनेक दिवसांपासून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक व्हावी अशी मागणी आहे .

न्यायालयीन कोठाडीत मृत्यू झाल्यावर मॅजेस्ट स्टेटमेंट चौकशी केल्यानंतर पुढे काय करावे ?याविषयीचा कायदा अपूर्ण आहे .त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी अशी मागणी न्यायालयाने केली आहे .सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आम्ही एसआयटी नेमण्याची मागणी केली .ही एसआयटी कोर्टाने नेमावी आणि कोर्टाच्या अधिपत्याखाली ती चालावी .मध्यंतरी गुन्हे अन्वेषण विभागाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चौकशी केली होती .पुढच्या सुनावणीच्या वेळी सीआयडी ला आरोपी करू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे .हायकोर्टाकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे .29 एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला न्यायालयाने सांगितले आहे .याप्रकरणी 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले .दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आता सीआयडी कडून तपास केला जाणार आहे .मात्र आम्हाला न्याय हवाय .आता न्यायमूर्ती तेलगावकर यांच्या अहवालातही पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे .मात्र तरीही सरकार न्याय देत नाही .जे जे दोषी आहे तर त्यांच्यावर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी सांगितलं .  काही दिवसांपूर्वी परभणी हिंसाचार प्रकरणात हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीत मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल सव्वातीन महिन्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या (Somnath Suryawanshi) न्यायालयीन मृत्यूप्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) कडे वर्ग करण्यात आला हाेता.

  • Related Posts

    इराणमधून पळालेल्या हिरॉइनला भारताचा आसरा, तिचीच ऑपरेशन सिंदूरला नाव ठेवत शत्रूंना साथ, गद्दारांना तडीपार करण्याची मागणी.

     इराणमधून भारतात पळून आलेल्या अभिनेत्रीने ऑपरेशन सिंदूरला नाव ठेवत पाकिस्तानचे सांत्वन केले आहे. तिची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला फटकरायला सुरुवात केली आहे.मुंबई- इराणमधली एक हिरॉइन अभिनेत्री बनण्यासाठी बॉलिवूडमध्ये आली.…

    पेढा भरवताना मस्करी, उदयनराजेंची अतुल भोसलेंना ‘हूल’.

    भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे पेढा भरवून अतुल भोसलेंचे स्वागत केले.भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात त्यांचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    इराणमधून पळालेल्या हिरॉइनला भारताचा आसरा, तिचीच ऑपरेशन सिंदूरला नाव ठेवत शत्रूंना साथ, गद्दारांना तडीपार करण्याची मागणी.

    इराणमधून पळालेल्या हिरॉइनला भारताचा आसरा, तिचीच ऑपरेशन सिंदूरला नाव ठेवत शत्रूंना साथ, गद्दारांना तडीपार करण्याची मागणी.

    पेढा भरवताना मस्करी, उदयनराजेंची अतुल भोसलेंना ‘हूल’.

    पेढा भरवताना मस्करी, उदयनराजेंची अतुल भोसलेंना ‘हूल’.

    तरुणाला रस्त्यात अडवलं अन्… घरापासून 20 मीटर अंतरावर भयंकर घडलं, नागपूर हादरलं.

    तरुणाला रस्त्यात अडवलं अन्… घरापासून 20 मीटर अंतरावर भयंकर घडलं, नागपूर हादरलं.

    लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवारांचे मोठे विधान, म्हणाले, आता लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देणार

    लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवारांचे मोठे विधान, म्हणाले, आता लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देणार