दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभागात झाडाझडती, बड्या अधिकाऱ्याचा पदभार काढला.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आता आरोग्य विभागात झाडाझडतीला सुरूवात झाली आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आता आरोग्य विभागात झाडाझडतीला सुरूवात झाली आहे. कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडील पदभार काढला आहे.बबिता कमलापुरकर यांच्याकडे होता कुटुंब कल्याणचा अतिरीक्त पदभार होता. ⁠कुटुंब कल्याण विभागाकडे माता मृत्यु रोखण्याची मुख्य जबाबदारी असते त्यामुळे हा विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. ⁠कमलापुरकर यांच्या जागी आता डॅाक्टर संदीप सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ⁠

कमालापुरकर यांच्याकडे आता फक्त पुण्याचा आरोग्य विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सांगळे यांच्याकडेही अतिरिक्त पदभार महत्वाच्या पदावर पुर्णवेळ आधिकार्याची नियुक्ती केलेली नाही. ⁠दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर कमलापुरकर यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडुन कारवाईला सुरवात झाल्याची चर्चा आहे.दिनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा सोमवारी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. बालेवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भिसे कुटुंबियांनी भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे घैसास यांचे लायसन रद्द करण्याची देखील मागणी केली होती.तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. आमदार गोरखे यांनी डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “भिसे कुटुंबियांचं सुरुवातीपासून हेच म्हणणं होतं की, या घटनेला डॉ. घैसास हेच जबाबदार आहेत. ज्या उदात्त भावनेने आमच्या सरकारने आणि मंगेशकर परिवाराने हे हॉस्पिटल चालू केलं त्याला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम डॉ. घैसास यांच्या कृतीनं केलं. म्हणून आमची प्रथम मागणी होती की, आधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीय. आता एक अहवाल आलाय. आता आणखी दोन अहवाल येतील. त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया होईल”, अशी प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी दिली.

  • Related Posts

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले,…

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.नवी मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.