प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे जामनेर घरकुल प्रकल्पास मार्ग मोकळा; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश.

प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे जामनेर घरकुल प्रकल्पास मार्ग मोकळा; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश. जामनेर तालुक्यातील गट क्रमांक 713 मधील शासकीय जमिनीच्या ताब्यासंदर्भात सुरू असलेला वाद नुकताच निकाली निघाला असून, सदर जमीन आता “पंतप्रधान आवास योजने”अंतर्गत घरकुल प्रकल्पासाठी वापरण्यास मोकळी झाली आहे.प्रांताधिकारी, जळगाव यांनी फेरफार नोंद क्र. 4160 रद्द करत सदर जमीन शासकीय असल्याचे स्पष्ट करून निर्णय दिला आहे.

या निर्णयामुळे नगरपरिषद, जामनेर यांना अंदाजे 57.08 आर क्षेत्रात घरकुल प्रकल्प राबविण्याची मुभा मिळाली असून, भूमिहीन व गरजू लाभार्थ्यांना घर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रलंबित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया, दस्तऐवजांचा सखोल अभ्यास, सामाजिक परिणाम यांचा विचार करून प्रांताधिकारी यांनी दिला असल्यामुळे अनेक गोरगरिबांच्या घराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या प्रकरणात जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत प्रशासकीय पातळीवर जागरुकता निर्माण केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सदर प्रकरणातील तथ्य समोर आले. नगरपरिषद, जामनेर यांनी स्पष्ट केले आहे की, सदर जमिनीचा वापर फक्त गरजू लाभार्थ्यांसाठीच केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    यावल वनविभाग येथील कार्यरत असलेले ,वनरक्षक अमर बारेला यांनी , संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना दिले मोलाचे मार्गदर्शन.

    संघर्ष अकॅडमी फैजपूर, येथे यावल वनविभाग येथील कार्यरत असलेले ,वनरक्षक अमर बारेला यांनी , संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करत असताना पेसा कायद्या 1996 अंतर्गत अनुसूचित…

    कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू.

     कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर दोन लहान मुलं जखमी झाले आहेत. कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून (Kalyan School wall collapses) मोठी दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत एका 11…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    यावल वनविभाग येथील कार्यरत असलेले ,वनरक्षक अमर बारेला यांनी , संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना दिले मोलाचे मार्गदर्शन.

    यावल वनविभाग येथील कार्यरत असलेले ,वनरक्षक अमर बारेला  यांनी , संघर्ष  अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना दिले मोलाचे मार्गदर्शन.

    कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू.

    कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू.

    धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, योग्य पर्याय निवडला!

    धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, योग्य पर्याय निवडला!

    मोठी बातमी! 10 दिवसांपासून फरार बंदुकधारी निलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या; नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी उचलला.

    मोठी बातमी! 10 दिवसांपासून फरार बंदुकधारी निलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या; नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी उचलला.