अहिरवाडीत पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणार्‍या दहा गोवंशाची सुटका.

रावेर पोलिसांनी गोवंशाची कत्तल होण्यापासून सुटका करीत वाहन जप्त करीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. अहिरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.गोपनीय माहितीवरून कारवाईमध्यप्रदेशातून एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील व सहकार्‍यांनी रविवारी रात्री अहिरवाडी गाठले.

पहाटे अडीचच्या सुमारास मध्य प्रदेशाकडून बोलेरो पिकअप गाडी येताना दिसताच तिला अडवण्यात आले. वाहनात 93 हजार रुपये किंमतीच्या सहा गायी व चार वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात होती. पोलिसांनी खानापूर गोशाळेत गोवंशाची रवानगी केली. बोलेरो पिकअप गाडी (एम.एच.04 एफ.यु.6217) पोलिसांनी जप्त केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत आरोपी आरोपी रायसिंग ऊर्फ भाया रामसिंग अजनाडे व आकाश शांताराम आवले ऊर्फ बारेला (लालमाती) यांच्याविरुद्ध गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.

  • Related Posts

    पुण्यातील तरूणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, बायकोच्या जबाबाने फिरली सूत्र, एक धागा अन् झाला उलगडा.

    पिंपरी चिंचवडच्या थेरगावात 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा उलगडा वाकड पोलिसांनी केला आहे. पत्नीच्या पुरवणी जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या दोन मित्रांनीच वैयक्तिक वादातून दारूच्या नशेत गळा चिरून…

    चांगले गुण देण्याचे आमिष देवून दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार !

    राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बुलढाण्यातील‎ मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देव तारी त्याला कोण मारी, बसचा अचानक फुटला बलून, चालकाचे डोके उडकले, आरडाओरड होताच…

    देव तारी त्याला कोण मारी, बसचा अचानक फुटला बलून, चालकाचे डोके उडकले, आरडाओरड होताच…

    वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

    वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

    फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले.

    फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले.

    गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त.

    गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त.