आंबे काढताना विद्युत तारेला स्पर्श, थरथरून गेला मजुराचा जीव, रत्नागिरीतील धक्कादायक घटना.

रत्नागिरी शहराजवळ आंबे काढताना तीस वर्षीय युवकाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. महेश इलम हा कमावता तरुण कुटुंबाचा आधार होता. या घटनेने इलम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी शहराजवळ आंबे काढताना तीस वर्षीय युवकाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्देवी रित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खेड तालुक्यातील पोसरे येथील महेश राजू इलम (३०, रा.) असे या युवकाचे नाव आहे. हातावरती पोट असलेला कुटुंबातील हा कमावता एकुलता एक मुलगा होता. इलम कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात व आंबा हंगामामध्ये कोकणात आंबे काढण्याची कामे तो करत असे.शनिवारी शहरानजीकच चंपक मैदान येथे आंबे काढत असताना तेथील विद्युत तारेला घळाचा स्पर्श लागून शॉक लागलेल्या कामगाराचा मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी 5 एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वा. सुमारास घडली. महेश राजू इलम (३०, रा. पोसरे, खेड, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. महेश इलम हा अनिल नार्वेकर यांच्याकडे कामाला होता. शनिवारी सकाळी चंपक मैदान येथील आंब्याच्या झाडावरील आंबे काढत होता.त्यावेळी त्याच्या हातातील घळाचा स्पर्श झाडाच्या बाजूनेच जाणाऱ्या विद्युत तारेला झाला. त्यामुळे महेशला शॉक लागून तो थरथरू लागला. ही बाब त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी महेशला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मजुरीसाठी फिरून आपला उदरनिर्वाह चालवणारा एकुलता एक मुलगा गेल्याने इलम कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. महेश याच्या पश्चात आई-वडील पत्नी तीन मुले असा परिवार आहे. हातावरती पोट असलेल्या या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेने हळहळ व्यक्त केली जातंय. कुटुंबाचा आधार असलेला तरूणच निघून गेल्याने कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    रविवारी रात्री उशिरा मिरा रोड येथील इंद्रप्रस्थ सोसायटीतून मोरे कुटुंबाला पिकअप केले. विवेक मोरे हे खाजगी क्षेत्रात नोकरी करतात. ते अपघातात बचावले, पण त्यांचा कॉलेजवयीन मुलगा निहार आणि त्यांची पत्नी…

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    पुणे वन विभाग सिंहगडासाठी लवकरच एक ॲप सुरू करणार आहे, ज्यामुळे पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग आणि गडावरील माहिती उपलब्ध होईल. यासोबतच, १ जूनपासून गडावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार असून, प्लास्टिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    संपूर्ण पराडकर कुटुंब संपलं, मुंबईहून कोकणात जाताना भीषण अपघात, भरणे नाक्यावर काय झालं.

    संपूर्ण पराडकर कुटुंब संपलं, मुंबईहून कोकणात जाताना भीषण अपघात, भरणे नाक्यावर काय झालं.

    तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासून अपघात, पुण्यात गंभीर घटना, महापालिकेने हात झटकले.

    तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासून अपघात, पुण्यात गंभीर घटना, महापालिकेने हात झटकले.