धक्कादायक! दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू.

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे PA सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये देत नाही तोपर्यंत उपचार करणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. पण तिचा मृत्यू झाला. पैशांच्या हापापलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या वागणुकीमुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला ही सर्वसामान्य नव्हती. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या होत्या.

सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत या घटनेची माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी अमित गोरखे यांचादेखील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ अमित गोरखे देखील असाच आरोप करताना दिसत आहेत. या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनाकडून आतापर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.”भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली. अनिशा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.”अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यांचा करुण अंत झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.”सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

  • Related Posts

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट झाडाला आदळली. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांनी आपला जीव गमावला आहे.भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळून दोन…

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    पुण्यातील भोर मतदारसंघावर संग्राम थोपटे यांची मजबूत पकड असून त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील सहा वेळा आमदार होते.  राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला.

    सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला.

    लग्नातला भामटा… फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात.

    लग्नातला भामटा… फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात.