पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला.

छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.बजाजनगर येथे राहणाऱ्या पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केले. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झाली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. कोमल ऋषिकेश खैरे (रा. बजाजनगर, ता. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर पती ऋषिकेश भिकाजी खैरे हा फरार झाला आहे. दोघांचा २०१७ मध्ये विवाह झाला. त्यांना एक पाच वर्षांची मुलगी देखील आहे.

कोमल आणि ऋषिकेश बजाजनगर येथे किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. काही महिन्यांपासून ऋषिकेशला दारूची सवय लागल्याने दोघांत नेहमी वाद होत होता. पत्नी २७ मार्च रोजी नारेगाव येथे माहेरी आली होती. समजावून सांगून दोघे बजाजनगर येथे आले होते. बुधवारी दुपारी कोमलच्या भावाला ती जखमी झाल्याची माहिती मिळाली. कोमलचा भाऊ सचिन डांगरे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे हे पुढचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.

वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत फोर क्लीप पाठीमागे घेत असताना साहित्य घेऊन गेलेल्या वाहन चालकाला धडक बसल्याने उपचारदरम्यान झाल्याची घटना मंगळवारी घडली. पुनमचंद जयप्रकाश कोमरे (वय ४७ रा. पडेगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत चालकाचे नाव आहे. महाराष्ट्र सॉ मिल कंपनीत (तिसगाव) ते चालक होते. १९ मार्च रोजी एमआयडीसीतील कंपनीत ते साहित्य घेऊन गेले होते.साहित्य खाली करण्यासाठी वाहनाच्या खाली उतरून वाट पाहत ते सुरक्षा भिंतीजवळ उभे असताना कंपनीतील फोर क्लीप पाठीमागे घेत असताना भिंतीच्या व फोर क्लीपमध्ये दबून ते जखमी झाले होते. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुलगा अर्जुन कोमरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे.

  • Related Posts

    पुण्यातील तरूणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, बायकोच्या जबाबाने फिरली सूत्र, एक धागा अन् झाला उलगडा.

    पिंपरी चिंचवडच्या थेरगावात 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा उलगडा वाकड पोलिसांनी केला आहे. पत्नीच्या पुरवणी जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या दोन मित्रांनीच वैयक्तिक वादातून दारूच्या नशेत गळा चिरून…

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अलीकडेच पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले. या प्रकारामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर वार करणाऱ्या अशा घटनेनंतरही,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    मोरे बापलेकाचा तीन महिन्यापूर्वीही अपघातात, कुटुंब सावरतं, तोच काळाचा पुन्हा घाला, सहा जणांचा मृत्यू.

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    सिंहगडावर जूनपासून प्लास्टिक बंदी, पाण्याच्या प्लास्टिक बाटलीबाबत मोठा निर्णय; डिपॉझिट भरुन…, नियम काय.

    संपूर्ण पराडकर कुटुंब संपलं, मुंबईहून कोकणात जाताना भीषण अपघात, भरणे नाक्यावर काय झालं.

    संपूर्ण पराडकर कुटुंब संपलं, मुंबईहून कोकणात जाताना भीषण अपघात, भरणे नाक्यावर काय झालं.

    तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासून अपघात, पुण्यात गंभीर घटना, महापालिकेने हात झटकले.

    तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासून अपघात, पुण्यात गंभीर घटना, महापालिकेने हात झटकले.