काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा?, कशामुळे त्याचा जीव गेला? ‘घातपात कि आत्महत्या?’ याबाबत तर्क वितर्क लावू लागले.

अखेर दोडामार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला.घटनास्थळचा पंचनामा आणि तिथल्या लोकांकडून माहिती घेतली असता सदरचा मृतदेह विर्डी येथील विद्देश लाडू गवस (वय ४५) या युवकाचा असल्याचे समजले.

दोन दिवसांपूर्वी कामावर जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. तो मात्र झाडावर लटकलेल्या वेदनादायी अवस्थेत मिळाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयत विद्देश यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने दोडामार्ग तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    गुजरातच्या तस्कराच्या आवळल्या मुसक्या, तब्बल आठ किलो गांजा जप्त, कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई.

    कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयास्पद प्रवाशाच्या बॅगेतून आठ किलो गांजा जप्त केला. गुजरातचा रहिवासी असलेला नरेशकुमार पंचोली नावाचा हा व्यक्ती लाखोंचा गांजा घेऊन जात असताना पकडला…

    १११ पुरुष, १२ बायका आणि नोटांची बंडलं, दीडशे पोलिसांनी छापा टाकला अन्…. पुणे फेक कॉल सेंटर प्रकरणाची संपूर्ण इन्साईड स्टोरी.

    २४ मे २०२५, शनिवारी रात्री १० वाजताची वेळ. सगळीकडे किर्रर्रर्रर्र काळोख. अशा अंधाऱ्या रात्री पुणे शहराचा वेग काहीसा मंदावला होता. लोकं झोपायला जाण्याची तयारी करत होते. आणि अशातच खर्डी परिसरातील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

    यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस, जूनमध्ये जास्त सरी बरसणार, हवामान विभागाची मोठी अपडेट.

    यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस, जूनमध्ये जास्त सरी बरसणार, हवामान विभागाची मोठी अपडेट.

    पाचोरा – भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश.

    पाचोरा – भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश.