जिल्ह्यात होत आहेत चारा कापताना सर्पदंश

जिल्ह्यात होत आहेत चारा कापताना सर्पदंश
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन
चारा कापताना काळजी घेतल्यास सर्पदंश टाळू शकतो

गेल्या 5 दिवसात डांभूर्णी, यावल या भागातून सर्पदंश झालेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या पैकी डांभूर्णी येथील शेतकऱ्याला कोब्रा तर यावल तालुक्यातील शेतकऱ्याला घोणस या विषारी सर्पा ने दंश केल्याचे दिसून आले आहे , हे दोन्ही रुग्ण शेतात चारा कापत असताना दंश झाला आहे शेतात काम करत असताना योग्य काळजी घेतली तर हे जीवघेणे दंश टाळता येऊ शकतात या साठी काय काळजी घ्यावी या बाबत वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
शेतात चारा कापताना पायात बूट घालणे, सभोवताल काठीने गवताची हालचाल करा किंवा हातात माती घेऊन गवतात फेकून काही क्षण थांबून मग लक्ष ठेऊन चारा काढा . शक्य झाल्यास हातात मोठे जाड सेफ्टी हातमोजे घालून काम करा.
साप भक्ष्याच्या शोधात शेतातील गोठ्यात किंवा घरा जवळील अडगळीत येत असतो, त्या मुळे विशेष काळजी घेतली पाहिजे

काय घ्यावी काळजी
घरात जमिनीवर झोपू नये घरात किंवा बाहेर बीळ असल्यास ती बुजावी, दरवाजा ला फट असल्यास बंद करावी घराच्या दरवाज्याला उंबरठा असावा, रात्रीच्या वेळी शूज उंच जागी ठेवावे त्यात रात्री साप आसरा घेतात
आय टी आय मुलांचे वसतिगृहात मध्यरात्री विद्यार्थ्यांना शूज मध्ये साप दिसल्याची घटना नुकतीच घडली होती त्या वेळी वन्यजीव संरक्षण संस्था सदस्य सर्पमित्र हेमराज सपकाळे यांनी मण्यार जातीचा साप रेस्कु केला होता . जिल्हाधिकारी निवासस्थानी मध्यरात्री आढळून आलेल्या सापास संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, राजेश सोनवणे यांनी रिक्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडला होता पाळधी सावदा रोडवर संत बाळू मामा मंदिरासमोर खडी मशीन मध्ये गणेश सपकाळे यांनी अजगर रेक्यु केला होता,
लोहारा येथे सर्पमित्र साई यांनी गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदात 3 फुटाचा अजगर रेस्क्यू केला
राजेश सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक यांचे बंगल्यात डुरक्या घोणस जातीचा साप रविंद्र भोई,जगदीश बैरागी यांनी सावखेडा शिवारातील शेतकऱ्यांच्या घरातून रात्री 5 फुटाचा कोब्रा रेस्कु केला.
धरणगाव येथे जिनिंग मध्ये आढळून आलेले नाग , घोणस , धामण व नागाचे पिलू भरत शिरसाठ व टीम ने रेस्कु करून निसर्गात सोडले आहेत संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके, सतीश कांबळे, निलेश ढाके, वासुदेव वाढे , ऋषी राजपूत, विनोद खोडपे, अरुण सपकाळे, दिनेश सपकाळे, विनोद सोनवणे , तुषार रंधे, रवींद्र भोई, अशोक खामकर, संतोष चौधरी, रितेश भोई, सुरेंद्र नारखेडे, राहुल सोनवणे या सर्पमित्रांनी विषारी, बिनविषारी , निम विषारी प्रजातींचे 200 पेक्षा जास्त सर्प रेस्क्यू करून निसर्गात मुक्त केले आहेत एकंदरीत शहरी भागात आणि ग्रामीण भागात सर्प आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध शाळा, ग्रामपंचायत, कंपनी मध्ये सर्प जनजागृती अभियान सुरू असून आपल्या गावात जनजागृती करायची असल्यास अध्यक्ष रविंद्र फालक ,सचिव योगेश गालफाडे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांना कळवावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

  • Related Posts

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका…

    अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले

    अजित पवार महायुतीत नसते तर… गुलाबराव पाटील असं का म्हणाले जळगाव : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्या महायुतीत नसता तर आम्ही शिवसेना शिंदे गटाने शंभर जागा जिंकल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द