फुटलेल्या काचा, तुटलेल्या संरक्षक जाळ्या, रहिवाशांमध्ये भीती; सिलिंडर स्फोटानंतर धारावीतील भीषण दृष्य.

धारावीत झालेल्या भीषण सिलिंडर स्फोटाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावारण पसरलं आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.इमारतींमधील खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, तुटलेल्या संरक्षक जाळ्या आणि रहिवाशांमध्ये अजूनही असलेली भीती… असे चित्र धारावातील सिलिंडर स्फोटाच्या ठिकाणी मंगळवारीही स्पष्ट दिसत होते. धारावीजवळच पीएनजीपी कॉलनीजवळील शीव-धारावी लिंक रोडवर घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरने भरलेल्या वाहनातील सिलिंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाले आणि हा संपूर्ण परिसर हादरला.हे स्फोट एवढे भीषण होते की, सिलिंडरचे तुकडे उडून जवळ असलेल्या म्हाडाच्या राजीव दर्शन को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील काही घरांतही घुसले. सुमारे ५० ते ६० सिलिंडरचे स्फोट झाल्याचे मुंबई अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे रस्त्याकडेला पार्क केल्या जात असलेल्या सिलिंडरने भरलेल्या वाहनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सोमवारी रात्री धारावीतील पीएनपीजी कॉलनीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या नेचर पार्कला लागून असलेल्या रस्त्यावर सिलिंडरने भरलेला ट्रक उभा होता. त्याच्या आजूबाजूला अन्य वाहनेही उभी केलेली होती. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिलिंडर असलेल्या वाहनातील सिलिंडरना अचानक आग लागली.

बघता बघता एकामागोमाग एक सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. दूरपर्यंत त्याचे आवाज ऐकू येत होते. घटनास्थळाच्या विरूद्ध दिशेला राजीव दर्शन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी ही म्हाडाची चार मजली इमारत आहे. स्फोटांमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली, अनेकांनी इमारतीबाहेर धाव घेतली.सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या स्वयम वाघमारे याने आपल्या आत्याला घेऊन घराबाहेर धाव घेतल्याचे सांगितले.पहिल्या दोन स्फोटांनंतर आवाजामुळे काहीच कळेनासे झाले.

मात्र तिसरा स्फोट होताच स्वयंपाकघरातून बाहेर पाहिले, तर केवळ आगीच्या ज्वाळा दिसल्याचे त्याने सांगितले. ‘हे आवाज कानठळ्या बसवणारे होते. स्फोटामुळे सिलिंडर उडून इमारतीच्या आवारात पडून एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी त्वरीत तळमजल्यावरील रहिवाशांना इमारतीबाहेर काढले,’ असे वाघमारे याने सांगितले. ‘आगीच्या मोठ्या ज्वाळा, एकामागोमाग एक होणाऱ्या स्फोटांमुळे लहान मुले रडू लागली. खबरदारी म्हणून आपल्या मजल्यावरील अनेकांना बाहेर पडून सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले, आपल्या कुटुंबीयांसोबत सुरक्षितस्थळी गेले,’ असे दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी नाजिका सिद्दीकी यांनी सांगितले.

  • Related Posts

    पुण्यातील तरूणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, बायकोच्या जबाबाने फिरली सूत्र, एक धागा अन् झाला उलगडा.

    पिंपरी चिंचवडच्या थेरगावात 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा उलगडा वाकड पोलिसांनी केला आहे. पत्नीच्या पुरवणी जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या दोन मित्रांनीच वैयक्तिक वादातून दारूच्या नशेत गळा चिरून…

    चांगले गुण देण्याचे आमिष देवून दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार !

    राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बुलढाण्यातील‎ मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नशेचं इंजेक्शन देऊन 38 दिवस कोंडलं, टिटवाळ्यात तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीसह 7 जणांवर गुन्हा.

    नशेचं इंजेक्शन देऊन 38 दिवस कोंडलं, टिटवाळ्यात तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीसह 7 जणांवर गुन्हा.

    पाकला मदत केली अन् जगासमोर इभ्रत गेली; चीनवर सलग दुसऱ्या दिवशी नामुष्की, भारताचा धडाका.

    पाकला मदत केली अन् जगासमोर इभ्रत गेली; चीनवर सलग दुसऱ्या दिवशी नामुष्की, भारताचा धडाका.

    भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले.

    भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले.

    आई घरी दिसेना, मुलगा शोधायला गेला अन् पायाखालची जमीनच सरकली; विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह.

    आई घरी दिसेना, मुलगा शोधायला गेला अन् पायाखालची जमीनच सरकली; विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह.