चोरटे घरात घुसले, काहीच मिळालं नाही, तर…. १२ वर्षीय चिमुकलीसोबत भयंकर कृत्य.

 चोरटे घरात चोरीसाठी घुसले, पण त्यांना घरात काहीच न मिळाल्याने त्यांनी १२ वर्षीय चिमुकलीसोबत भयंकर कृत्य केलं आणि तिच्या कान-नाकातून दागिने काढून घेतले. या घटनेने खळबळ उडाली आहे.देशभरात चोरी, मारामाऱ्या, दरोडे अशा गुन्हेगारीच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत. नुकतीच एक चोरीची घटना समोर आली, पण या चोरीदरम्यान चोरट्यांनी एका चिमुकलीचीही निर्घुण हत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून चिमुकलीच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.एका घरात चोरट्यांनी प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना घरात काहीही मिळालं नाही. त्या घरातच एक १२ वर्षीय मुलगी होती. घरात काही न मिळाल्याने चोरट्यांनी त्या मुलीच्या कानातील आणि नाकातील दागिने काढले आणि नंतर तिचा गळा कापून तिची हत्या केली. राजस्थानातील बांसवाडा येथील पालोदा येथे ही भीषण घटना घडली.घरातील कुटुंबीय बाहेरुन आल्यानंतर त्यांना चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

मुलीला अशा अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. ही घटना तात्काळ पोलिसांत कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून काही पुरावे गोळा करत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य पती, पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह सकाळी ५ वाजता शेतात कामासाठी गेले होते. यावेळी त्यांची एक १२ वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर लुटलं आणि अल्पवयीन मुलीची हत्या केली आणि तिच्या कानातील-नाकातील दागिने घेऊन निघून गेले.

दिवसाढवळ्या अशाप्रकारे घरात झालेल्या चोरीच्या घटनेने, चिमुकलीच्या हत्येने परिसरात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांनी या घटनेचा निषेध करत, घटनेबाबत रोष व्यक्त करत संपूर्ण परिसरात बंद केला होता. चिमुकलीला न्याय मिळावा तसंच आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी काही पुरावे ताब्यात घेतलं आहेत. तसंच चिमुकलीच्या हत्या करणारे आणि घरात लुटमार करणारे कोण होते, चोरटे होते, की आजूबाजूचे कोणी ओखळीचे होते, या सर्व दृष्टीने तपास सुरू आहे.

  • Related Posts

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अलीकडेच पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले. या प्रकारामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर वार करणाऱ्या अशा घटनेनंतरही,…

    चांगले गुण देण्याचे आमिष देवून दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार !

    राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बुलढाण्यातील‎ मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे बारावी पास.

    शासकिय आशादिप महिला वसतीगृह, जळगांव येथील विद्यार्थिनी लक्ष्मी  शिंदे बारावी पास.

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील