मुलांच्या शिक्षणसाठी वर्ल्ड व्हीजन इंडिया संस्थाचे उपक्रम आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सायकल वाटपाचा कार्यक्रम टहाकली गावामध्ये आयोजीत करण्यात आला. वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव या संस्थेमार्फत फुलपात व टहाकली गावातील 38 मुला – मुलींना सायकल वाटप करण्यात आले. टहाकली व फुलपात गावातील मुले – मुली दररोज पायी चालत पाळधी इथे शाळेत जात होते. पायी जाण्यामुळे त्यांना शारीरिक त्रास आणि शाळेत जायला उशीर सुध्धा होत असे. लवकर जाण्यासाठी ते रेल्वे पटरीवरून शॉर्ट कट घेत होते. त्यामूळे पालक चिंतित राहायचे. ही बाब जाणून वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत मुलांना सायकल वाटप करण्यात आले.मुले आता वेळेवर शाळेत जातील व त्यांना शारीरिक त्रास होणार नाही. वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविकता केली. त्यांनी मुलांना शाळेत जाण्यासाठी मार्गदर्माशन केले. या कार्यक्रमाला उपस्थिती प्रमुख पाहुणे गुलाबराव पाटिल (पालक मंत्री जळगाव जिल्हा तथा पानीपुराठा व स्वछता राज्य मंत्री ) यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले.तसेच त्यांनी मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रवृत्त केले. त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाच्या माध्यमाने अजून 1000 सायकल मुला – मुलींच्या शिक्षण पूर्ण करण्याकरिता वाटप करण्यात येईल. गुलाबरावजी पाटील मंत्रीचे स्मृति चिन्न च स्वरुप वर्ल्ड व्हीजन इंडिया चे कप देऊन सत्कार जीतेन्द्र गोरे -प्रकल्प अधिकारी यांचा हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शरद पाटील जिल्हा परिषद मुख्याध्यापक व अंकिता मेश्राम वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रोग्राम समन्वयक यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित मुकुंद नन्नावरे माझी पंचायत समिती सदस्य, सचिन पवार माझी सभापती, नारायण सपकाळे, ग्रामसेवक टहाकली फुलपाट संजय जाधव, सरपंच टहाकली सुरेश कोळी, उपसरपंच टहाकली मधुकर पाटील, सरपंच फुलपाट मंगलाबाई दत्तू पाटील, उपसरपंच फुलपाट विमलबाई देविदास भील, सर्व ग्रामपंचायत सदस्य फुलपाट टहाकली , अंगणवाडी सेविका फुलपाट टहाकली हे उपस्थित होते. तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया चे निखिल कुमार सिंह, रतीलाल वळवी, जितेंद्र पाटील, वैष्णवी पाटील, मनीषा पाटील उपस्थित होते.
हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…