विश्व आदिवासी दिनानिमित्ताने देवरे विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न
नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसेविखरण- आप्पा आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे विश्व आदिवासी दिनानिमित्ताने यहामोगी माता,वीर बिरसा मुंडांचे व क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन विखरण येथील उपसरपंच प्रतिनिधी चंदू कान्हु पवार,माजी सरपंच बापू विश्राम पाटील,माजी सरपंच केशव वामन पाटील,बोराळा येथील मान्यवर रवींद्र कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी केले.’आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर उपशिक्षक एम.डी.नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचे पेहराव तसेच विविध वेशभूषा करून आदिवासी नृत्यांनी विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांची व विद्यार्थ्यांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी.भारती यांनी तर आभार वाय.डी.बागुल यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे, एस.एच. गायकवाड, आर.आर. बागुल,एम.एस.मराठे, एस.जी.पाटील, एच.एम.खैरनार यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 33