* यावल महाविद्यालयात वृक्षारोपण
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल मध्ये दिनांक 05/08/2024 रोजी प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागामार्फत वृक्ष रोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आले. वृक्ष रोपण म्हणजे एक पाऊल वन संवर्धनाकडे या विषावर प्रा. नरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्याना थोडक्यात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला , प्रा. नंदकिशोर बोदडे , प्रा. अर्जुन गाढे , प्रा. प्रतिभा रावते, प्रा. अक्षय सपकाळे,प्रा.सुभाष कामडी,अमृत पाटील तसेच भूगोल विभागातील विध्यार्थी उपस्थितीत होते