अपघातात जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव – पाचोरा दरम्यान दि.२८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातून घरी परतत असतांना अपघात होवून निशाांत विजय पाटील (राजपूत) (वय १९, रा. गोराडखेडा ता. पाचोरा) तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे निशांत पाटील हा तरुण वास्तव्यास होता. तो जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. दि. २८ रोजी तो दुचाकीने महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी निघाला. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास वावडदा ते वडलीदरम्यान आला असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात निशांतच्या डोक्याला जबर मार लागलेला असल्याने नातेवाईकांनी त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, निशांतवर उपचार सुरु असताना सोमवारी दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनासाठी निशांत याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे.

  • Related Posts

    भीषण: चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले..

    भीषण: चोपड्यात ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चौघांना चिरडले.. जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी, राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था झालीय. अनेक बसमध्ये ना खिडक्या, ना व्यवस्थित दारं,…

    पुण्यातील तरूणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, बायकोच्या जबाबाने फिरली सूत्र, एक धागा अन् झाला उलगडा.

    पिंपरी चिंचवडच्या थेरगावात 5 ऑक्टोबर 2023 रोजी एका बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा उलगडा वाकड पोलिसांनी केला आहे. पत्नीच्या पुरवणी जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या दोन मित्रांनीच वैयक्तिक वादातून दारूच्या नशेत गळा चिरून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    वैष्णवीच्या तान्ह्या बाळावरही दया आली नाही! जनकराजेच्या अंगावर दिसल्या ‘अशा’ खुणा…

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.

    यूपीएससी टॉपर, परराष्ट्र मंत्रालयात अधिकारी; पाक एजंटच्या प्रेमात पडली अन्… कहाणी देशद्रोही माधुरी गुप्ताची.