महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची जळगाव जिल्हा बैठक संपन्न.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची जळगाव जिल्हा बैठक संपन्

जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची जळगाव जिल्हा बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणारे, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारे, ठिंबक सिंचन चा वापर करत असलेले, फळबाग शेतकरी, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय करणारे,शेळी पालन करणारे, इत्यादी प्रकारे शेती करत असलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा जळगाव जिल्ह्यात होणार या सन्मान सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव अमोल भिसे साहेब, भागवत कांदे साहेब उपस्थित राहतील.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना मिळवून देण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी तत्पर रहावे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

या बैठकीत जळगाव शहर उपाध्यक्ष सचिन पवार आणि मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष पदी किशोर वाघ यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विध्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा कल्पेश पवार , जिल्हा सचिव अमोल पाटील रावेर लोकसभा, जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र माळी, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष विनोद पाटील, शहर सचिव हर्षल वाणी, संदिप मांडोळे संदिप लोहार इत्यादी उपस्थित होते.

 

 

अविनाश भास्कर पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना

  • Related Posts

    पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

    काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

    दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला.

    सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला.

    लग्नातला भामटा… फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात.

    लग्नातला भामटा… फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात.