साखरेचा शेतकरी सुपुत्र स्वप्नील झाला पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक
अभ्यास, कष्ट, परिश्रम, व जिद्दीमुळेच यश शक्य— स्वप्निल पाटील
धरणगाव तालुका प्रतिनिध :- राजु बाविस्कर
धरणगाव तालुक्यातील साकरे येथील अतिशय सर्वसामान्य शेतकरी श्री दिनकर पाटील यांचा सुपुत्र स्वप्नील याने
एम एस्सी (फिजिक्स) नंतर स्पर्धा परीक्षा एम पी एस सी चा अभ्यास करण्यासाठी जळगाव मध्ये खाजगी क्लासेस मध्ये मोठ्या भावाकडे राहुन जिद्दीने, परिश्रमाने, चिकाटीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा उत्तीर्ण करून गावाचा व तालुक्याचा मान उंचावला आहे. लहानपणापासून कुशाग्र बुध्दीमत्ता व नम्र असलेला स्वप्निल भविष्यात उतुंग यश मिळवेलच याची शाश्वती सर्वांना होती. प्रतिकूल परिस्थितीत त्याने यशोशिखराव गाठल्याने साकरे व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.त्याबद्दल त्याचे पंचक्रोशीतील नागरिकांनी, माता-पिता व मोठे भाऊ सुदर्शन पाटील यांनी खूप खूप अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याला पुढील यशासाठी, कार्यासाठी समस्त नागरिकांनी खूप खूप आशीर्वाद दिले.