मोगली ला पोलीस खाकी दाखवतात मोगली याने 3,18,000/- काढून दिले,

पैशाच्या बॅगा चोरुन जळगाव जिल्हयात धुमाकुळ घालणा-या परराज्यातील टोळीच्या म्होरक्यांच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकाने आवळल्या मुसक्या

जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयात बँकेसमारुन व गर्दीच्या ठिकाणी पैशाच्या बॅगा चोरीचे वाढलेले गुन्हे उघड करुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.

त्यांनुसार. बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउनि राहुल तायडे, पोउनि गणेश वाघमारे, पोहवा नंदलाल पाटील, पोहवा प्रमोद लाडवंजारी, पोहवा किरण धनगर, पोना भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोकों ईश्वर पाटील, चालक पो कॉ प्रमोद ठाकुर अशांचे पथक केले. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी पैशांच्या बॅग चोरणा-या इसमांचा शोध घेण्याच्या सुचना पो.नि बबन आव्हाड यांनी पथकास दिलेल्या होत्या.

त्यांनुसार पोहवा नंदलाल पाटील व पोना भगवान पाटील यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, दोन दिवसापुर्वी पारोळा शहरातील स्टेट बैंक परीसरातील पैशाची बॅग चोरी करणारी टोळी पुन्हा पैशाची बॅग चोरी करण्याच्या ईरादयाने पारोळा शहरात संशयीरीत्या फिरत आहे. त्यावरुन वरीलप्रमाणे पथकाने गोपनीय माहीतीवरुन पारोळा शहरातील धरणगाव माथाळा भागात एका संशीयत इसमास सापळा रचुन ताब्यात घेतले. सदर इसमास चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बसंत बनवारीलाल शिसोदिया वय ३० वर्षे रा. कढीयागाव ता. पचोर जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश असे सांगितले.

त्याची त्याच ठिकाणी अंगझडती घेतली असता त्याचेकडे रोख रक्कम रुपये ३,१८,०००/- मिळुन आले. सदर पैशाबाबात विचारणा केली असता त्याने दोन दिवसापूर्वी पारोळा शहरातील स्टेट बँक परीसरात त्याच्या गावातील साथीदार रिशी सिंगदर सिसोदीया व विशाल ऊर्फे मोगली सिसोदीया रा. गुलखोडी ता. पचोर जि. राजगढ अशांनी मिळून पैशाची बॅग चोरी केल्याचे सांगितले. सदर पैशाच्या बॅग चोरीचा म्होरक्या असल्याचे सांगुन तो पारोळा शहरात पुन्हा एकदा चोरी करण्याकरीत आला असल्याचे सांगितले. तसेच त्याने यापुर्वी पाचोरा, धरणगाव जिल्यात अशाच प्रकारच्या पैशाच्या बॅगा चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन त्याने पारोळा पोलीस स्टेशन गु.र.नं २१६/२०२४, भा. न्या. सं कलम ३०३ (२), धरगाव पोलीस स्टेशन गु.र.न.२६०/२०२४भा. न्या. सं कलम ३०३ (२), व पाचोरा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१७/२०२४ भा.न्या. सं कलम ३०३(२), प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केले. तरी आरोपी नामे वसंत बनवारीलाल शिसोदिया वय ३० वर्षे यास पोराळा पोलीस स्टेशन येथे मुददेमालासाह पुढील गुन्हयाच्या तपासाकामी ताब्यात देण्यात आले आहे.

  • Related Posts

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका…

    पुण्यात ‘मुळशी पॅटर्न, कॉलेजला जात असताना. हडपसरमध्ये खळबळ.

    पुण्यात रामटेकडी परिसरात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्या पूर्ववैमनस्यातून केली गेली. मृत मुलगा बारावीत शिकत होता. वानवडी पोलिसांनी केस नोंदवून दोन आरोपींना अटक केली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द