चांगदेव महाराज यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न.

चांगदेव महाराज यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न. चांगदेव महाराज मंदीर, मेहुण, कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील वार्षिक यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.बैठकीस मुक्ताईनगरचे आमदार मा. चंद्रकांत पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, मंदिर समितीचे सन्माननीय पदाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ ,स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे निर्णय व निर्देश:यात्रेच्या काळात भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष नियोजन, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना.प्रशासनाने यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्ण कटिबद्ध असल्याचे सांगत सर्व संबंधित विभागांना योग्य ती तयारी करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासन, मंदिर समिती आणि पोलिस विभाग एकत्रितपणे कार्यरत राहणार आहेत.

  • Related Posts

    पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

    काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

    दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमित शाहांनी तंबी दिलीय, फडणवीसांची चाकरी करा नाहीतर…’; शिंदे गटावर निशाणा साधताना राऊतांचे मोठे विधान.

    अमित शाहांनी तंबी दिलीय, फडणवीसांची चाकरी करा नाहीतर…’; शिंदे गटावर निशाणा साधताना राऊतांचे मोठे विधान.

    आईच्या कुशीत निजलेल्या चिमुकलीला बिबट्याने उचललं, दोन वर्षीय बालिकेचा हृदयद्रावक अंत.

    आईच्या कुशीत निजलेल्या चिमुकलीला बिबट्याने उचललं, दोन वर्षीय बालिकेचा हृदयद्रावक अंत.

    महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर घणाघात.

    महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर घणाघात.

    पाहुणा आला, गप्पांचा फड रंगला, घरातील इतर सदस्य बाहेर जाताच काढला काटा, मोठी खळबळ.

    पाहुणा आला, गप्पांचा फड रंगला, घरातील इतर सदस्य बाहेर जाताच काढला काटा, मोठी खळबळ.