फक्त आम्हीच टारगेट का? मोबाईल नंबरची सक्ती कुठेही नको ; व्यथा सामान्य जनांच्या.

फक्त आम्हीच टारगेट का? मोबाईल नंबरची सक्ती कुठेही नको ; व्यथा सामान्य जनांच्या

आज ऑफिसला सुट्टी असल्याने मग झोपेतून थोडा उशीराच उठलो सकाळी तयार होवून म्हटलं जरा चौकात जाऊ चौकात आल्यानंतर मित्रमंडळी सोबत गप्पा सुरू होत्या त्यात हळूहळू जिवनाशी निगडित विषय निघाला त्यावेळी असे वाटले कि इतका तंतोतंत मुद्देसूद विषयावर कुणीच लक्ष घालायला तयार नाही शेतीपासून, शेतमजुरी वरून, नोकरी पर्यंत जो मुद्दा चर्चेत निघाला होता तो होता मोबाईल व रिचार्ज आज बॅंकेत प्रत्येक खात्याला मोबाईल नंबर असने आवश्यक केले आहे मोबाईल नंबर खात्यास लिंक नसेल तर खातेदारला त्याचे पैसे असुन सुद्धा ओळख पटवून सुध्दा पैसे दिले जात नाही का ? तर मोबाईल नंबर खात्यास लिंक नाही ज्या लोकांना, महिलांना कुठलीही आवक नाही मजुरी करु शकत नाहीत त्या जेष्ठ नागरिकांना शासनाकडून मानधन दिल जातं त्यांना दरमहा मानधन दिलं जातं नाही ते मिळत दोन , तिन महिन्यातुन मग मोबाईल रिचार्ज करायचा कसा जेव्हा मोबाईल नव्हते त्यावेळी पण बॅंकेत व्यवहार चालायचे मग आता प्रत्येकाला सक्ती का असा विषय आमचा मित्र मंडळी सोबत सुरु होता तेंव्हा खरच वाटल की आपण कुठ चाललोय लहान मुलं अभ्यास सोडून हातात मोबाईल घेऊन मस्त खेळतांना दिसतात परंतु हाच मोबाईल आता काही जणांना नकोसा झाला आहे


आजकाल एक वेगळीच पद्धत आपल्याला पहावयास मिळत आहे जो तो उठून सुटून आपआपल्या परीने भाव खाऊन मोकळा होतोय कुणी राजकीय क्षेत्रात ताव मारतोय तर कुणी नेटवर्क क्षेत्रात भाव खातोय एक सामान्य माणसांचे काय नुसत त्याच मतदान घ्यायच मग तुम्ही कोण आम्ही कोण ज्याला शेतकरी राजा म्हणतात त्यांचे काय आज त्या शेतकरी राजाच्या सर्व सर्वच शेतीउपयोगी साहित्याचे भाव गगनाला भिडलेत शेतात माल असे पर्यंत भाव मार्केटला असतो तो माल शेतातुन पिकवून घरी आला कि भाव गडगडले त्यातल्या त्यात शेतमालाला भाव शेतकरी नाही ठरवत ठरवतात ते व्यापारी महागडी बियाणे, रासायनिक खते,औषधी, फवारणी , शेतमजुरी, मग शेतकऱ्यांच्या हातात खर्च वजा शिल्लक राहिले काय ? हा साधा विचार कुणी करीत नाही.

सर्व सामान्य माणसाचे काय मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांचे काय पाऊस वेळेवर राहिला तर काम शेतात पिक राहिलतर तर मोलमजुरी चालते नाही तर काही नाही नोकरी वाले आपल्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त दररोजच एकच टेन्शन बॉस काय म्हणेल किंवा प्रोजेक्ट अपुर्ण तर तो ओरडेल हे आपले सर्वांचे आयुष्य तुम्ही म्हणाल यात काय तर आता मला सांगायचे असे आहे आपण जगतोय कोणत्या युगात बॅंकेत गेलो , सरकारी कार्यालयात गेलो किंवा इ.ठिकाणी हे महाशय आपल्याशी व्यवस्थितपणे बोलत नाहीत जावू द्या हा विषय पण महत्त्वाचं असं सध्या मोबाईल सिम रिचार्जचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत यांनी नुस्ती लोकांची मर्जी सुध्दा जाणणं योग्य समजले नाही या लोकांना हे भाव परवडतील कि नाही मोबाईल एक काळाची गरज होवून बसला आहे बॅंक खाते आहे तर नंबर लिंक करा केवायसी करा.घरात दहा मेंबर असतिल व सर्वांचं एका बॅंकेत खाते असेल तर प्रत्येकाने वेगवेगळा मोबाईल नंबर खात्यास लिंक करा , गॅस सिलेंडर आहे तर मोबाईल नंबर लिंक करा केवायसी करा, आधार कार्ड असेल तर नंबर लिंक करा रेशन कार्ड ला केवायसी करा या सर्वांसाठी लागेल तो मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर एवढा भाव खाऊन बसलाय कि दहा रुपये रोज ( रोजगार) या मोबाईला सामान्य माणूस, शेतकरी देईल कसा तुम्ही जसे आमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या नियमावली नुसार आम्हाला नियम लागू करतात तसे बॅंकेला का नाही एक परिवार एक मोबाईल नंबर, मोबाईल कंपन्यावर का नियंत्रण नाही, केबल डिश टिव्ही यांचे रिचार्ज वर का नियंत्रण नाही मॉल्सवर का नियंत्रण नाही अहो जरा आमचा ही विचार करा प्रत्येक गोष्ट आज आमच्या हातातुन निघून जातेय असा काय गुन्हा केलाय आम्ही कि प्रत्येक गोष्टीसाठी जिव जाळावा जरा सर्व सामान्यांसह शेतकरी राजाचा विचार करा शेतकरी जगला तर देश टिकेल ज्या कंपन्या भाव वाढवण्यासाठी धडपडत आहेत त्यांची कॉलिटी बघा कोणत्या स्वरूपाची आहे ते तर बघा नेटवर्क कंपन्या फोर जी सांगून टू जी , थ्री जी, सांगुन आपला गल्ला भरण्यात व्यस्त आहेत मग आम्ही करावं काय ? म्हणूनच सर्व सामान्यासह शेतकरी म्हणाताय फक्त आम्हीच टारगेट का ? बँकेला मोबाईल नंबरची सक्ती करायची गरजच काय दरवेळी फक्त आम्हीच टारगेट का ?

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द