मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाजाला दिलेला शब्द पुर्ण करावा अन्यथा.

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाजाला दिलेला शब्द पुर्ण करावा अन्यथा १५ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषण दीपक रणनवरे

नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे


परशुराम आर्थिक विकास महामंडळ व ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या साठी जालना येथील गांधी चमन येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करूनही मागील सहा महिन्यात साध परशुराम आर्थिक विकास महामंडळ करुन शकणाऱ्या सरकारला ब्राह्मण समाजासाठी काही देण्याची इच्छा नाही असे दिसते त्यामुळे १५ आॕगष्ट च्या आत जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी १००० कोटीचा निधी व इतर मागण्या देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने पुन्हा दीपक रणनवरे आमरण उपोषण करणार महामंडळ कार्यरत झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. अशी माहिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिली.


समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आंदोलनाचाच एक भाग म्हणून २२ जानेवारी २०१९ चे आझाद मैदानावर धरणे आंदोलन यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील काही केले नाही २८ नोव्हेंबर रोजी गांधी चमन जालना येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले जालन्याचे पालक मंत्री अतुलजी सावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेतले व दि १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा सोबत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , मंत्री अतुलजी सावे , छगनरावजी भुजबळ ,संदिपान भुमरे , संजय राठोड आमदार मनिषा कायंदे आमदार नारायण कुंचे आमदार नमिता मुंदडा यांच्या सह जालना जिल्हाधिकारी सर्व विभागाचे सचिव यांच्या उपस्थिती मध्ये मुख्यमंत्री महोदयानी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी इतिवृत्त तयार झाले यामधे ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुण असा उल्लेख करून इतिवृत्त तयार वास्तविक पाहता ब्राह्मण समाजातील गरजू ना लाभ मिळायला हवा परंतु तरुण आर्थिकदृष्ट्या मागास या शब्दाचा वापर करून शब्दछल करत इतिवृत्त बनवले यावर संघर्ष समितीने हे दुरुस्त करून लवकर प्रस्ताव तयार करावा अशी मागणी केली

परंतु त्यानंतर सरकारने संघर्ष समितीच्या व ब्राह्मण समाजाच्या मागणी अजिबात लक्ष दिले नाही अजूनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार झाले नाही याचा अर्थ ब्राह्मण समाजाच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता दिसत आहे  तरी १५ आॕगष्ट पर्यत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून १००० कोटी चा निधी तात्काळ देऊन महामंडळ कार्यान्वित करावे अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती १५ आँगष्ट पासून दीपक रणनवरे प्रातिनिधिक स्वरूपात आमरण उपोषण करणार आहे असे संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक   दिपक रणनवरे धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी विजयाताई कुलकर्णी इश्वर दिक्षित अँड राजेंद्र पोदार अँड बलवंत नाईक स्वप्नील केळकर , अशोक वाघ , उदय जोशी , ॲड भानुदास शौचे , शाम कुलकर्णी, महेश अकोलकर संतोष कुलकर्णी संजय देशपांडे किशोर पाठक अँड शेखर जोशी मंदार कुलकर्णी स्वप्निल पिंगळे अनिल डोईफोडे सतीश ईडोळकर ॲड प्रज्ञा भिडे अनिल दिक्षित  यांनी सांगितले .

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द