शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचा लाभ घ्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई.

 राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे.  जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अग्रीस्टॅग योजनेंतर्गत फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सोपान टोणपे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.

या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे.पालकमंत्री देसाई म्हणाले, या योजनेमूळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे.  शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.  पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येणार आहे.

 

  • Related Posts

    “अहो.. हिच्या पोटात बाळ वाढतंय”, १३ वर्षांच्या कॅन्सर पीडितेवर मदतनीसाकडूनच अत्याचार.

     बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले. कॅन्सर असल्यामुळे तिला केमो थेरपी घ्यायला लागत होती. केमो थेरपीला गेली असतानाच तपासणीदरम्यान मुलीच्या पोटात…

    पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल जप्त.

    दिघी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पहिली कारवाई रविवारी (दि. ३०) सायंकाळी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पत्नीसोबतची सहल ठरली शेवटची, पनवेलच्या दिलीप देसलेंना अखेरचा निरोप, कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश.

    पत्नीसोबतची सहल ठरली शेवटची, पनवेलच्या दिलीप देसलेंना अखेरचा निरोप, कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश.

    ‘आम्हाला परत यायचंय, काही तरी व्यवस्था करा’, काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची आर्त साद.

    ‘आम्हाला परत यायचंय, काही तरी व्यवस्था करा’, काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची आर्त साद.

    मोबाईल जप्त करताच मुलीला आला राग, काढली चप्पल अन् केली शिक्षिकेची धुलाई, कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल.

    मोबाईल जप्त करताच मुलीला आला राग, काढली चप्पल अन् केली शिक्षिकेची धुलाई, कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल.

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?