महीलांचे मोबाईल हिसकावून चोरी, सदर गुन्ह्याचे तपासात निष्पन्न.

जळगाव शहरात सार्वजनिक रोडवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परीमंडळ अशोक नखाते उपविभागीय पोलीस

अधिकारी संदीप गावीत यांनी दररोज सायंकाळी गर्दीचे ठिकाणी पायी पेट्रोलींग करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम व मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाया करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या, त्या अनुषंगाने शनिपेठ पो.स्टे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ /1356 विजय खैरे, पोना/1598 विजय निकम, पोकॉ 122 अनिल कांबळे, पोकों 490 मुकुंद गंगावणे, पोकों 2001 विकी इंगळे असे दिनांक 15/07/2024 रोजी रात्री 21.30 वाजेचे सुमारास पायी पेट्रोलींग करीत असतांना संशयीत नामे 1) जाकीर शहा युनुस शहा वय-23 वर्षे रा. अल्फसा मशिदजवळ फातीमानगर, एमआयडीसी परीसर जळगाव 2) इम्रानशहा फिरोज शहा वय-22 वर्षे मुळ रा. मेनगाव ता. जामनेर हल्ली रा. टिपु सुलतान चौक, तांबापुरा जळगाव हे त्यांचे कब्जात ओप्पो, विवो कंपनीचे 05 महागडे अॅन्ड्रॉइड मोबाईल हॅन्डसेट घेवून मोटारसायकलवर संशयास्पद स्थितीत जातांना मिळुन आल्याने, त्यांचे मोटारसायकलचा चेसीस नंबर खोडलेला असल्याने त्यांचेवरील संशय बळावल्याने सदर इसमांकडे मोबाईल हॅन्डसेटबाबत विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांचेविरुध्द शनिपेठ पो.स्टे. ला गु.र.नं. 157/2024 महाराष्ट्र पोलीस अधिनयम कलम 122,124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्ह्याचे तपासात असे निष्पन्न झाले

की सदर संशयीतांनी त्यांचे कब्जात असलेले मोबाईल हॅन्डसेट हे दिनांक 07/07/2024 रोजी जळगाव शहरातील सागर पार्क मैदानाजवळ, गिरणा टाकीजवळ तसेच आणखी इतर दोन ठिकाणाहुन रस्त्याने जाणारे महीलांचे हातातुन हिसकावून चोरून नेलेले असल्याची कबुली दिली आहे. सायंकाळचे वेळी सार्वजनिक रोडवर फोनवर बोलत चालणा-या महीलांचे मोबाईल हिसकावून चोरी करण्याची सदर आरोपीतांची गुन्हे कार्यप्रणाली असुन सदर आरोपीतांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने पो. नि. धारबळे यांचे मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोहवा 1104 इंदल जाधव हे करीत आहे. सदर गुन्हा करतेवेळी वापरलेली बजाज प्लॅटीना मोटार सायकल रजी. नंबर MH19CB 9114 देखिल जप्त करण्यात आलेली आहे. दिनांक 07/07/2024 रोजी रामानंदनगर पो. स्टे. हद्दीत झालेल्या मोबाईल स्नॅचिंगबाबत दाखल असलेल्या 02 गुन्हयात सदर आरोपीतांचा सहभाग असल्याचे निश्चीत झालेले आहे तसेच चोरुन नेलेल्या एका मोबाईलचा पॅटर्न लॉक हा वेगवेगळे पॅटर्न ट्राय करून सदरचे लॉक उघडून फोन पे द्वारे रु. 1500/- फिर्यादीचे खात्यातुन काढुन घेतले असल्याचे आरोपीतांनी कबुल केले आहे.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!