घरफोडी करणा-या आरोपीता कडून घरफोडीतील 70 ग्रॅम सोने व 100 ग्रॅम चांदी मध्य प्रदेश येथुन जप्त
फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हां रजि. क्रमांक 122/2024 भादवि. कलम 454,457,380 प्रमाणे दि.24/05/2024 रोजी दाखल होता. सदर गुन्ह्यात एकूण 3,03,000/- रुपयाचा रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. सदर गुन्ह्यांचा तपास हा पो. उपनिरी. मैन्नुद्दीन सय्यद यांचे कडेस देण्यात आला होता. तसेच फैजपुर पोलीस स्टेशन गुन्हां रजि. क्रमांक 145/2024 भादवि कलम 457,380 प्रमाणे दि. 18/06/2024 रोजी दाखल होता. सदर गुन्ह्यात एकूण 1,28,000/- रुपये किंमतीचे रोख रक्कम व सोन्या चादीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. सदर गुन्हयांचा तपास पोहेकॉ. 2459 रविद्र मोरे हे करीत होते.
सदर बरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो जळगाव परिमंडळ, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह मॅडम, फैजपुर उपविभाग फैजपुर यांच्या मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पो.. उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, पोहेकों, 2459 रविंद्र मोरे, पोहेकों. 1764 अनिल पाटील, पोहेकों. 1329 मोती पवार, पोहेकों. 1959 विकास सोनवणे, पो. कॉ. 442 भुषण ठाकरे असे करीत असतांना शिरपूर शहर पोलीस स्टेशन जिल्हा धुळे गुन्हां रजि. क्रमांक 359/2024 भादवि.क. 399,402 मधील अटक आरोपी यांचे वर्णन वरील नमूद गुन्ह्यांतील आरोपीता प्रमाणे गुन्ह्यांचे तपास दरम्यान पाहीलेल्या सी. सी. टीव्ही कॅमे-यावरुन एकसारखेच दिसून आल्याने सदर गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांचेशी संपर्क करुन तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकाने शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन चौकशी केली. सदर आरोपीतांनी वरील गुन्ह्यांची कबुली दिल्याने आरोपी नामे 1) राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय 26 वर्षे, 2) ईश्वरसिंग नूरबिनसिंग चावला वय 23 वर्षे दोघे रा.उमर्टी ता.बरला जि.बडवाणी मध्य प्रदेश यांना पो. उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद यांनी शिरपुर शहर पोलीस स्टेशन च्या गुन्ह्यांतुन फैजपुर पोलीस स्टेशनच्या वर नमुद गुन्ह्यांत वर्ग करुन आणुन त्यांची अटके दरम्यान चौकशी करुन मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह मॅडम यांनी फैजपुर उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, फैजपुर पोलीस स्टेशन, पो.कॉ. 3254 विकार शेख, पो.कॉ. 1371 समाधान ठाकुर रावेर पोलीस स्टेशन, पो.ना.3244 वसिम अरमान तडवी यावल पोलीस स्टेशन यांचे पथक तयार केले. सदर पथकास योग्य त्या सुचना देऊन पथकाने आरोपी क्रमांक 1 यास मा. वरीष्ठांच्या परवानगीने मध्य प्रदेश राज्यातील इंदौर येथे घेऊन जाऊन त्यांचे कडून फैजपुर पोलीस स्टेशन येथील 2 गुन्हे, राधेर पोलीस स्टेशन येथील 2 गुन्हे, यावल पोलीस स्टेशन येथील 2 गुन्हे, अडावद पोलीस स्टेशन येथील । गुन्हां असे एकूण 7 गुन्ह्यांची कबुली देऊन त्या गुन्ह्यांमधील 70 ग्रॅम सोने व 100 ग्रॅम चांदी असा एकूण 3,55,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला असुन तो तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांनी जळगाव जिल्ह्यात एकुण 10 गुन्हे केले
आहे. सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो जळगाव परिमंडळ, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, फैजपुर उपविभाग फैजपुर यांच्या मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पो. उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, पोहेकॉ.2459 रविंद्र मोरे, पोहेकॉ. 1764 अनिल पाटील, पोहेकॉ. 1329 मोती पवार, पोहेकों. 1959 विकास सोनवणे, पोहेकों. 1357 बाळू भोई. पो.ना.3046 विशाल मोहे, पो.कॉ.377 दिनेश भोई, पो. कॉ.442 भूषण ठाकरे, पो.कॉ.3115 मो. जुबेर शेख अशांनी केली आहे.