चोपडा वैदकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांना त्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
चोपडा प्रतिनिधी – समाधान कोळी
डॉक्टराच्या दिरंगाई मुळे मृत्यु झालेला व रुग्णाच्या जिवीताशी खेळ करणाऱ्या डॉक्टरांची तसेच रुग्णालयात खाजगी पंटर द्वारे मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईका कडून पैसे उकळणाऱ्या डॉक्टावर कठोर कारवाई करावी .
संदर्भ १ ) दि. २ जुलै २०२४ रोजि शवविच्छेदन झालेले प्रेत कुटुंबाच्या ताब्यात देण्याकरिता १२०० रुपयांची मागणी करणाऱ्या डॉक्टरांच्या खाजगी पंटरची चौकशि करून त्या डॉक्टारांवर कठोर कारवाई करावी संदर्भ २ ) दि . १ जुलै २०२४ रोजि उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे डॉक्टरांच्या दिरंगाई मुळे १ इसमाचा मृत्यु झालेला आहे परंतु त्याच्या मृत्युस जबाबदार कोण ज्यांच्या बेजबाबदार पणामुळे त्या इसमाचा मृत्यु झाला त्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करून त्यांना कायम स्वरूपी सेवा मुक्त करून कठोर कारवाई करण्यात यावी . संदर्भ ३ ) गेल्या आठवड्यात चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे एक आदिवासी गर्भवती महिला प्रसूती करिता आली असता डॉक्टरांनी त्या महिलेला सिजर करण्याची आवश्यकता असल्याने तिला तुम्ही जळगाव येथे घेऊन जा असे नातेवाईकांना सांगितले त्या गर्भवती महिलेला मोठ्या प्रमाणात प्रसुतीच्या वेदना होत असल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी चोपडा शहरातील एक आदिवासी डॉक्टर डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या खाजगी रुग्णालयात घेऊन गेले त्या गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ३० मिनिटात ती महिला नैसर्गिकरित्या प्रसूत झाली व डॉक्टर बारेला यांनी त्या महिलेला जीवनदान दिले परंतु त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयाच्या ज्या डॉक्टरांनी मृत्यूच्या मार्गावर सोडून । आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे आपण त्या डॉक्टरां वर कारवाई करून कायमस्वरूपी सेवामुक्त करावे जेणेकरून रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिला यांच्यावर योग्य उपचार होऊन त्यांच्या जिवितास हाणि होणार नाही .
संदर्भ ४ ) उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे ज्या डॉक्टरांची नेमणूक झालेली असेल त्यापैकी किती डॉक्टरांचे खाजगी रुग्णालय आहेत याची चौकशी करण्यात यावी कारण ज्या डॉक्टरांचे खाजगी रुग्णालय आहे त्यांना आपला पुरेसा वेळ शासकीय रुग्णालयात देता येत नाही आपला पुरेसा वेळ ते आपल्या खाजगी रुग्णालयात घालऊन वैयक्तिक स्वार्थ साधतात त्यामुळे ज्या डॉक्टरांचे खाजगी रुग्णालय असेल त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी
संदर्भ ५ ) उपजिल्हा रुग्णालयचोपडा येथे दिनांक २ जुलै २०२४ रोजी एक मयत इसमाचे शव विच्छेदन झाले परंतु शव विच्छेदन झाल्यानंतर मयत इसमाच्या नातेवाईकांकडून बाराशे रुपयांची मागणी करण्यात आली बाराशे रुपयांची मागणी करणारा व्यक्ती हा कुठल्या डॉक्टरांशी संबंधित आहे कुठे डॉक्टरांचा खाजगी भंडार आहे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी संदर्भ ६ ) उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे दिनांक १जुलै २०२४ रोजी एक इसमाचा मृत्यु झाला तसेच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला सिझर करण्याच्या नावाने उडवा उडवीचे उत्तरे देऊन तिची हेळसांड करणारे तसेच मृत व्यक्तींच्या नावावर त्यांच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्यांना पाठीशी घालणारे वैदकिय अधिक्षक डॉ . सुरेश पाटील हे जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी .
निवेदनात नमूद केलेल्या मागण्या या जनहिताच्या असून गोरगरीब सर्वसामान्य व्यक्ति करता अत्यावश्यक आहेत आपण येत्या दोन दिवसात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी तसेच ०१ जुलै २०१४ रोजी मृत्य व्यक्तीच्या मृत्युस जबाबदार कोण ? याची खात्री करून येत्या दोन दिवसांत कारवाई न केल्यास १२ जुलै २०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालया समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच संघटनेचे चोपडा तालुका अध्यक्ष अनिताताई बाविस्कर यांच्या उपस्थितित व चोपडा शहर अध्यक्ष बबिता बाविस्कर यांच्या नेतृत्वा खाली संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन केले जाईल याची कृपया आपण नोंद घ्यावी . असे निवेदण संघटनेच्या वतीने देण्यात आले त्याप्रसंगी चोपडा ता . अध्यक्ष अनिताताई बाविस्कर चोपडा शहर अध्यक्ष बबीता बाविस्कर उपाध्यक्ष कल्पना अहिरे ता . उपाध्यक्ष अनिता बाविस्कर . दिवानजी साळुंखे . प्रविण करत काळे उपस्थीत होत तसेच चोपडा येथिल गरुड सेनेच्या कार्यकर्त्यांनी दि . ९ जुलै २०२४ आज रोजि झालेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला व आंदोलनाच्या यशस्वीते करिता दिपक बाविस्कर यांनी परिश्रम घेतले