महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावामहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप सारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र  स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता सीड अंतर्गत  घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरीता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होण्याबाबत मुख्य सचिव यांच्याकडे संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.

  • Related Posts

    मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा! ‘या’ रुग्णालयांसह २७ रुग्णालयांना फटका

    मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, मुंबई मनपा रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी, पालिकेने थकीत रक्कम न भरल्याने हा निर्णय घेतला आहे.मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये…

    आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्तीने पारोळेकरांसाठी टोलधारकांनी राखला तोल. ओळखपत्र व २० रूपयांत सुटणार खाजगी वाहन.

    आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्तीने पारोळेकरांसाठी टोलधारकांनी राखला तोल. ओळखपत्र व २० रूपयांत सुटणार खाजगी वाहन. पारोळा – राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सबगव्हाण टोल हा गेल्या ५ महिन्यांपासुन सुरू झाला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मध्यरात्री काळाचा घाला, पाच वाहनांचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू.

    मध्यरात्री काळाचा घाला, पाच वाहनांचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू.

    फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातुन ‘मैत्री’! शिक्षकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवत मुलीने केले ‘हे’ .

    फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातुन ‘मैत्री’! शिक्षकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवत मुलीने केले ‘हे’ .

    मी पोलिसांना घाबरत नाही, महिन्याला हप्ता द्यायचा, पुण्यातील वारजेमध्ये खंडणीची धमकी देत मारहाण

    मी पोलिसांना घाबरत नाही, महिन्याला हप्ता द्यायचा, पुण्यातील वारजेमध्ये खंडणीची धमकी देत मारहाण

    मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा! ‘या’ रुग्णालयांसह २७ रुग्णालयांना फटका

    मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा! ‘या’ रुग्णालयांसह २७ रुग्णालयांना फटका

    परस्त्रीचा मोह झाला,प्रेमविवाह केलेल्या पतीला आपल्या पत्नीचाच विसर पडला

    परस्त्रीचा मोह झाला,प्रेमविवाह केलेल्या पतीला आपल्या पत्नीचाच विसर पडला

    पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.