केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा  पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूम शी जोडणार, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या. राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या 14 सेवा आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक,पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाकडून अनुदानित प्रकल्पामध्ये नाशिक येथील राम – काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील पाण्याखालील सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे. स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत अहमदनगर येथे किल्ल्यावरील पर्यटक आकर्षणासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे या सर्व कामांच्या निविदा लवकरात लवकर पूर्ण करून ही कामे लवकर सुरू करावीत.राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा-पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांची सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पर्यटन विभागाने 31 मार्च पूर्वी उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र ,साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅरव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हीलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटचे नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टेच नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवरआंतरराष्ट्रीय पातळीवरती राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच रोड शो साठी महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितूर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, दिल्ली येथे होणारा भारत पर्व, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, बर्लिन येथे आयटीबी अंतर्गत, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझमकॉनक्लेव मध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्देपर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करणे, पर्यटन धोरण 2025 अंतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे ही कामे प्राधान्याने करापर्यटन विभागाचे कामका जाकरिता ई ऑफिस चा वापर करावा.पर्यटन विभागाची वेबसाईट अद्यावत करा.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने पर्यटन विभागातील उपक्रम यांना प्रसिद्धी देणे, चॅट बोट, ऑनलाइन भाषांतर, प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे या बाबींना प्राधान्य देणारपर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वने,नगरविकास,ग्रामविकास,महसूल,गृह आणि ऊर्जा यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे व अधिसूचना जाहीर करा.मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यातील ज्या स्मारकाकडे पर्यटक आकर्षित होतात ती स्मारके अधिसूचित करण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षते खाली पर्यटन सल्लागार समिती स्थापन करा.
पर्यटन विकासासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलनालय विभागाकडून जलदमंजुरी आणि सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करा.

प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय,धार्मिक स्थळे, विमानतळ विकसित करा.पहिल्या टप्प्यात शिर्डी,पुणे,नागपूर,शेगाव येथे काम सुरू करापाटबंधारे विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा काही भाग पर्यटन व्दारे विकसित करणे.गोराई आणि मनोरी येथे थीम पार्क विकसित करणे,विंटेज कार संग्रहालये विकसित करणे,मार्कडा,लोणार येथे टेंट सिटी विकसित करामार्कंडा,लोणार व कळसूबाई येथे फिरते तंबू शहर विकसित करणे, कोकण किनारट्टीवरील तारकर्ली आणि काशिद बिच वर ब्ल्यू बीच मोहीम राबवा. समुद्रकिनाऱ्यावर वाळू कला प्रशिक्षण आणि पाहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी नामवंत कलाकार सुदर्शन पटनायक सारख्या कलाकारांचे सहकार्य घ्या.

  • Related Posts

    पहिल्या बायकोला जास्त वेळ, म्हणून दुसरी रागात, भावांच्या मदतीने पतीलाच पाठवले ढगात.

    पिंपरी रोडवरील कॉलनीत दुसऱ्या पत्नीने तिच्या दोन भावांसह पतीला बेदम मारहाण केली. यानंतर तिने धारदार शस्त्राने वार करून क्रूरपणे पतीची हत्या केली. वास्तविक, भावसार मूळचंद पवार उर्फ ​​बाळा हा खेळणी…

    अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर स्वच्छेने बाहेर पडा; अजित पवारांची अपात्र लाडक्या बहिणींना विनंती.

    लाडकी बहीण योजनेचा लाभ आयकर भरणाऱ्या महिलांनीही घेतला आहे. त्यामुळे अपात्र महिलांनी यातून स्वच्छेने बाहेर पडा, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पहिल्या बायकोला जास्त वेळ, म्हणून दुसरी रागात, भावांच्या मदतीने पतीलाच पाठवले ढगात.

    पहिल्या बायकोला जास्त वेळ, म्हणून दुसरी रागात, भावांच्या मदतीने पतीलाच पाठवले ढगात.

    अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर स्वच्छेने बाहेर पडा; अजित पवारांची अपात्र लाडक्या बहिणींना विनंती.

    अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर स्वच्छेने बाहेर पडा; अजित पवारांची अपात्र लाडक्या बहिणींना विनंती.

    जळगावातील दोन मित्रांवर टोळक्याने केला सशस्त्र हल्ला.

    जळगावातील दोन मित्रांवर टोळक्याने केला सशस्त्र हल्ला.

    शासकीय ठेकेदाराची तब्बल ७८ लाखात अशी झाली फसवणूक.

    शासकीय ठेकेदाराची तब्बल ७८ लाखात अशी झाली फसवणूक.