उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्हा कारागृहात जेलरने महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत कारागृहातच अश्लील वर्तन आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. जेलरवर तात्काळ कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्हा कारागृहात जेलरने महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत कारागृहातच अश्लील वर्तन आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. जेलरवर तसा बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर जेलर जितेंद्र कश्यप यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर जेलरवर विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
बागपत जिल्हा कारागृहातील एका महिला अधिकाऱ्याच्या आरोपानुसार, जिल्हा कारागृह अधीक्षक कृष्णकांत मिश्रा ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर जेलर जितेंद्र कश्यप यांच्याकडे अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या ड्युटीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला जेलरने अधीक्षक कार्यालयात भेटलेल्या महिला अधिकाऱ्याला बोलावून गैरवर्तन केले. एवढेच नाहीतर त्यांचे कपडे फाडून बलात्कार करण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला गेला आहे.