अपघातग्रस्तांना मिळणार कॅशलेस उपचार; नितीन गडकरींची मोठी घोषणा, फक्त एकच अट…

या योजनेत अपघातानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास पीडितांच्या उपचाराचा ७ दिवस किंवा कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाईल.रस्ते अपघातांतील मृतांची संख्या दरवर्षी लाखोंमध्ये पोहोचलेल्या आपल्या देशात अशा अपघातांत जखमी झालेल्यांना उपचारांसाठी केंद्र सरकार आता थेट मदत देणार आहे. अपघातग्रस्तांवर मोफत (कॅशलेस) व तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नवी योजना जाहीर केली. या योजनेत अपघातानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास पीडितांच्या उपचाराचा ७ दिवस किंवा कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाईल.

याबाबतचे सूतोवाच गडकरी यांनी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत दिले होते. दरम्यान धनदांडग्यांच्या हिट अँड रन प्रकरणांत एखाद्या निरपराधाचा मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतील, अशी घोषणाही गडकरी यांनी केली. राज्यांच्या परिवहन मंत्र्यांसोबत प्रगती मैदानात (भारत मंडपम) झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी रस्ता सुरक्षा, जुनी वाहने स्क्रॅप करणे आणि भारताच्या ऑटोमोबाइल उद्योगाच्या विकासाबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाने काही राज्यांमध्ये हा कॅशलेस प्रकल्प पायलट म्हणून राबविला होता. त्या योजनेत काही कमतरता आढळल्यावर त्यात आम्ही सुधारणा करत आहोत.आपल्या मंत्रालयाचे रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून गडकरी यांनी सांगितले की, मागील वर्षात रस्ते अपघातात किमान १ लाख ८० हजार लोकांनी आपला जीव गमावला. यापैकी ३० हजार लोकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाला आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे यातील ६६ टक्के मृत हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत.ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या लोकांमुळे झालेल्या अपघातांमध्ये जवळपास तीन हजार मृत्यू झाले आहेत. ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांची कमतरता आणि देशात २२ लाख चालकांची गरज यावरही त्यांनी भर दिला. आमच्या बैठकीचा महत्त्वाचा अजेंडा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र होता. आपल्या देशात सध्याच्या घडीला तब्बल २२ लाख वाहन चालकांची कमतरता आहे. पण याबाबत आम्ही नवीन धोरणही बनवले आहे, असे गडकरी म्हणाले.चार महिन्यांपूर्वी जपानला मागे टाकत भारत वाहन उद्योग क्षेत्रात जगातील तिसरा मोठा देश बनला असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली. देशाच्या वाहन उद्योग क्षेत्राची उलाढाल आता २२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असेही गडकरी म्हणाले.

  • Related Posts

    मित्रांना घरी पाठवून पत्नीवर अत्याचार करायला लावायचा, परदेशात बसून VIDEO पाहायचा

    नवरा असाही असू शकतो यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, एका नवऱ्याने आपल्या पत्नीवर आपल्याच मित्रांना अत्याचार करण्यास भाग पाडले. इतकंच नाही तर तो याचे अश्लील व्हिडिओही बनवायचा.एका महिलेने…

    भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..

     भुसावळ शहर, जे गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत असते, तेथे आज (१० जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील हॉटेलमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मित्रांना घरी पाठवून पत्नीवर अत्याचार करायला लावायचा, परदेशात बसून VIDEO पाहायचा

    मित्रांना घरी पाठवून पत्नीवर अत्याचार करायला लावायचा, परदेशात बसून VIDEO पाहायचा

    भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..

    भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..

    एक्सपायर झालेल्या तारखा बदलण्याचं काम जीवावर बेतलं,बाटल्यांच्या स्फोटात कुटुंब होरपळलं

    एक्सपायर झालेल्या तारखा बदलण्याचं काम जीवावर बेतलं,बाटल्यांच्या स्फोटात कुटुंब होरपळलं

    बुलेटवर येऊन तरुणावर गोळीबार, युवक गंभीर जखमी; जळगाव हादरलं

    बुलेटवर येऊन तरुणावर गोळीबार, युवक गंभीर जखमी; जळगाव हादरलं

    खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,

    खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,

    दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी

    दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी