या कामासाठी ४५ कोटी तीन लाख सोळा हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून ज्या प्रमाणात निधी मिळेल त्या प्रमाणात शाळा व उपचार केंद्राचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने एकेडब्ल्यू कंस्ट्रक्शन प्रा. लि. आणि मुळेज इंजिनीअरिंग या दोन संस्थांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका विशेष मुलांसाठी शाळा, उपचार केंद्र आणि संशोधन केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पासाठी हडको एन १२ येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून हा प्रकल्प ( Chhatrapati sambhaji nagar municipal corporation school )उभा केला जाणार आहे.
शहरात महापालिकेच्या पन्नास शाळा आहेत. या शाळांमधून सर्वसामान्य मुले शिक्षण घेतात, परंतु पालिकेच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी आतापर्यंत कोणताच उपक्रम राबवण्यात आलेला नाही. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या खासगी संस्था शहरात आहेत, त्यांचे काम देखील उल्लेखनीय आहे, असे असले तरी आता महापालिकेने विशेष मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी एक शाळा विकसित करण्यात येणार असून याच शाळेच्या परिसरात उपचार केंद्र व संशोधन केंद्र देखील सुरू केले जाणार आहे.शाळेच्या परिसरात विशिष्ट प्रकारचे उद्यानदेखील विकसित करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. स्पर्ष आणि संवेदनांवर आधारित हे उद्यान असेल असे सांगितले जात आहे. हडको एन १२ येथे महापालिकेची शाळा आहे, या शाळेच्या आवारातच विशेष मुलांसाठी शाळा सुरू केली जाणार आहे. पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.या कामासाठी ४५ कोटी तीन लाख सोळा हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून ज्या प्रमाणात निधी मिळेल त्या प्रमाणात शाळा व उपचार केंद्राचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने एकेडब्ल्यू कंस्ट्रक्शन प्रा. लि. आणि मुळेज इंजिनीअरिंग या दोन संस्थांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहराची प्रशासकीय संस्था आहे. महानगरपालिकेत लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो, त्याचे प्रमुख महापौर असतात आणि शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि पोलिसांचे व्यवस्थापन करतात. राज्यातील आघाडीच्या विविध राजकीय पक्षांचे सदस्य महामंडळात निवडून आलेली पदे भूषवतात.