उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं.तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काही देणंघेणं नाही. असं वाटण्याचं कारण म्हणजे वाघोली येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आणि काही जखमी अवस्थेत असलेल्या मजुरांची परिस्थिती.
वाघोली येथील केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का? दोन वेळचं पोटभर अन्नही नशिबात नसणाऱ्या, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्या आपघातग्रस्त मजुरांना समाज आणि सरकारकडून मदत आणि न्याय मिळणार का? असे अनेक प्रश्न सकाळी सकाळी हाती आलेल्या मन सुन्न करणाऱ्या या बातमीने निर्माण केले आहेत

या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांमध्ये आक्रोश पसरला आहे. या घटनेमध्ये नेमकी चुक कोणाची हा सवाल आता उपस्थित झाला आहे. आपलं घरदार सोडून पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या गरिब मजुरांची जे दिवसभर कष्ट करुन दमुन-भागून रस्त्याच्या कडेला झोपले होते. की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाची जो उन्मत वाहन चालवत होता त्याची? या प्रश्नाचं उत्तर बहुधा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु ही वेळ फक्त प्रश्नांची ऊकल करण्याची नसून समाज म्हणून आपली आणि जबाबदारी म्हणून सरकारने पीडीतांना मदत करण्याची आहे.
ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती.यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले कामगार लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी आणि पिडीत कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी ही विनंती.

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द