महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

 प्रकल्प सुरू करण्यात काही अडचणी आल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या १० हजार ७७३ प्रकल्पांनी या अनुषंगाने अपेक्षित कार्यवाही केलेली नसल्याने महारेराने या प्रकल्पांची ही झाडाझडती सुरू केलेली आहे. महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकासकाला प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात स्पष्टपणे नोंदवावी लागते. या घोषित प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतर प्रकल्प पूर्ण झालेला असेल तर भोगवटा प्रमाणपत्रासह प्रपत्र ४ सादर करावे लागते. प्रकल्प अपूर्ण असेल तर नूतनीकरणासाठीची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे. प्रकल्प सुरू करण्यात काही अडचणी आल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या १० हजार ७७३ प्रकल्पांनी या अनुषंगाने अपेक्षित कार्यवाही केलेली नसल्याने महारेराने या प्रकल्पांची ही झाडाझडती सुरू केलेली आहे.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराने सुमारे १० हजार ७७३ व्यापगत (लॅप्स) प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात नागपूरच्या ५४८ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांनी तीस दिवसांत अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोंदणी स्थगित वा रद्द होणार आहे. नोटीस बजावलेल्या प्रकल्पांनी महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी दिलेल्या प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतरही त्या प्रकल्पाचे काय झाले, याविषयी कुठलीही माहिती अद्ययावत केली नाही. महारेराने या अनियमिततेची गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकल्पांनी तीस दिवसांत प्रकल्प पूर्ण झाला का, त्याचे भोगवटा प्रमाणपत्र, प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, प्रपत्र ४ सादर करणे किंवा प्रकल्पाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करणे; अशी कारवाई पूरक कागदपत्रांसह करणे अपेक्षित आहे.विहित मुदतीमध्ये कुठलाही प्रतिसाद न देणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याचे महारेराने ठरविले आहे. याअंतर्गत अशा प्रकल्पाची थेट नोंदणी रद्द करणे किंवा स्थगित करणे, प्रकल्पावर दंडात्मक कारवाई सोबतच या प्रकल्पातील कुठल्याही सदनिकेच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी न करण्याच्या सूचना सह जिल्हा निबंधकांना देणे, शिवाय प्रकल्पाचे बँक खाते गोठवणे अशा प्रकारची कारवाई महारेरातर्फे केली जाणार आहे. नोटीस दिलेल्या १० हजार ७७३ प्रकल्पांत नेहमीप्रमाणेच मुंबईलगतच्या भागांसह कोकणचा समावेश असलेल्या मुंबई महाप्रदेशातील प्रकल्पांची ५,२३१ अशी सर्वात जास्त संख्या असून यानंतर पुणे परिसर ३,४०६, नाशिक ८१५, नागपूर ५४८, संभाजीनगर ५११, अमरावती २०१, दादरा आणि नगरहवेली ४३ आणि दमण दिवच्या १८ प्रकल्पांचा समावेश आहे.

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.