एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे. पार्सलमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि बॅटरी आढळल्या असून, रिमोटद्वारे स्फोट घडवल्याचा अंदाज आहे. पार्सल घेणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. एक अतिशय धक्कादायक घटना पुढे आलीये. पार्सलमध्ये बॉम्ब पाठवण्यात आला. डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन घरी पोहोचला आणि त्याने ते पार्सल संबंधित व्यक्तीच्या हातात देताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झालीये. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून त्याची चाैकशी केली जातंय. ही अतिशय हैराण करणारी घटना अहमदाबादमध्ये घडलीये. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.
जुन्या वैमनस्यातून हे पार्सल पाठवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि बॅटरी जप्त केल्या आहेत. अहमदाबादचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीरज बडगुजर यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिलीये. बडगुजर हे म्हणाले की, साबरमती परिसरात राहणारे बलदेव सुखाडिया हे शनिवारी त्यांच्या घरात होते. त्यावेळी तिथे डिलिव्हरी बॉय एक पार्सल घेऊन पोहोचला.डिलिव्हरी बॉयने हे पार्सल बलदेव सुखडिया यांच्या हातात दिले. हे पार्सल बलदेव यांच्या हातात जाताच मोठा स्फोट झाला. बलदेव आणि डिलिव्हरी बॉय दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. गौरव गढवी असे डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या पार्सलमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि बॅटरी ठेवल्याचे सांगितले. रिमोटच्या मदतीने हा स्फोट केला असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला.बलदेव सुखडिया यांच्या हातात पार्सल गेले की, कोणीतरी रिमोटचे बटण दाबले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हे पार्सल पाठवले आहे. बलदेव यांनीही पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.