दीपस्तंभ फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले,,
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जनसामान्यांना आधार देण्याचे पुण्य कर्म करत आहात, स्वामी विवेकानंद म्हणतात, मै उसी को महात्मा कहता हु, जिसका हृदय गरीबो के लिए रोता है, अन्यथा वह तो दुरात्मा हे, स्वामीजींच्या याच विचारांच्या प्रेरणेने ‘ शिवभावे जीव सेवा ‘
हे जगण्याच्या वृत म्हणून आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित आहात,
आपल्या या समाजसेवेच्या साऱ्या एरंडोल वासियांना सार्थ अभिमान आहे. आपल्या कार्यास मानाचा मुजरा ‘ दीपस्तंभ फाउंडेशन ‘