मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शिक्षकांचे वेळेवर पगार दया. मानधन वाढवून मुदत वाढवून दया. व पर्मनंट करा. अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया
मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शिक्षकांना वेळेवर पगार दया. मानधन वाढवून मुदत वाढवून दया. व पर्मनंट करा. अन्यथा पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकांच्या वेळेस महागात पडेल. अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांच्याकडून तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षकांकडून राज्य शासनाला इशारा. अभिलाल दादा देवरे 88 88 94 62 54 सांगतात मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व मा. शिक्षकांना दोन ते तीन महिन्यापासून पगार मिळत नाही. शिक्षकांचा पगार तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावा. असे पत्र आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व प्रा.व मा. शिक्षकांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, शिक्षणाधिकारी व तहसीलदार मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग यांना देण्यात आले. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पगार मिळत नाहीत म्हणून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची दैनंदिन अवस्था झाली आहे.
ज्या दिवसापासून सर्व शिक्षक प्राथमिक व माध्यमिक शाळेत ड्युटी करत आहेत. त्या कालावधीमध्ये दीपावली आली परंतु शिक्षकांना दीपावलीला सुद्धा पगार दिला नाही. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची सुरुवात झाली, आचारसंहिता लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक आपल्याला बोलू शकले नाहीत. आमच्या मनात एकच विश्वास होता. महायुतीची सत्ता येईल आणि आम्ही सर्व शिक्षकांनी जर महायुतीला साथ दिली, तर आम्हाला आमचा पगार वेळेवर मिळेल. तसेच मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शिक्षकांना सहा महिन्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तसेच अजित दादा पवार आम्हाला पर्मनंट करतील. असा विश्वास ठेवून महाराष्ट्रातील सर्व शिक्षक तसेच लाडक्या बहिणी महायुती सोबत भक्कमपणे आम्ही उभे राहिलो. तसेच अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला जाहीर पाठिंबा होता. आता आम्हाला विश्वास आहे महायुती महाराष्ट्रात बहुमताने निवडून आली. परत महायुतीची सत्ता आली ज्या प्रकारे आम्ही आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो, त्याच प्रकारे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शिक्षकांना सुद्धा आपण वेळेवर पगार दया. मानधन वाढवून मुदत वाढवून द्या व आम्हाला पर्मनंट करा. अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला मागात पडेल. प्रा.शि. अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्मचारी.
Post Views: 2,661